Crispy KFC Style Fried Chicken Recipe: लोकांना चिकनचे खूप वेड असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. ते नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या चिकन फूडच्या शोधात असतो. नॉनव्हेजप्रेमींना पावसाळ्याची मजा द्विगुणित करायची असेल, तर आजच आम्ही सांगितलेली रेसिपी फॉलो करा. होय, आज आम्ही तुम्हाला चिकन पकोड्यांची एक वेगळीच रेसिपी सांगत आहोत. जे खायला खुसखुशीत आहे तसेच त्याची चव KFC च्या चिकन सारखी असेल. चला तर मग जाणून घेऊया चिकन पकोड्यांची रेसिपी आणि त्याला KFC लुक देण्यासाठी काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
चिकन मॅरिनेशनसाठी :
- अर्धा किलो चिकन ड्रमस्टिक्स
- एक लिंबू
- मोठा चमचा आलं लसूण पेस्ट/ लसूण पावडर
- मोठा चमचा लाल तिखट
- अर्धा चमचा हळद
- अर्धा चमचा जिरे, धणे पावडर
- मीठ चवीनुसार
आवरणासाठी:
- एक वाटी मैदा
- एक चमचा लसूण पावडर
- एक चमचा चिली फ्लॅक्स
- एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर
- मीठ चवीनुसार
- तेल तळण्यासाठी
कृती :
- सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुवून त्याला वरील दिलेले साहित्य वापरून मॅरीनेट करा. चिकन मॅरीनेट केल्यावर ते जास्तीत जास्त ५ तास तर कमीतकमी १ तास तसेच ठेवा.
- वरचे आवरण तयार करण्यासाठी एका भांड्यात मैदा, कॉर्नफ्लोअर, लसूण पावडर, चिली फ्लॅक्स, मीठ एकत्र करून पाण्याने भज्याच्या पिठासारखे भिजवून घ्या.
- मॅरीनेट केलेले चिकन भिजवलेल्या पिठाच्या मिश्रणात बुडवून ठेवा. त्यानंतर कढईत गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्या. अशाप्रकारे गरमागरम KFC स्टाईल चिकन ड्रमस्टिक्स तयार होतात.
हेही वाचा – चटपटीत चिकन कटलेट रेसिपी! एकदा खाल तर खातच रहाल! लगेच नोट करा ही सोपी रेसिपी
- हेच कृती तुम्ही चिकन पॉपकॉन बनवण्यासाठी देखील वापरू शकता. गरमागरम केएफसी चिकन तुम्ही मेयॉनीज अथवा कोणत्याही सॉस सोबत खाऊ शकता.