रोज उठून कोणती भाजी करायची असा प्रश्न आपल्यासमोर असतोच. घरातल्या सगळ्यांना सगळ्या भाज्या आवडतात असे नाही. मग प्रत्येकाच्या आवडीनुसार भाज्या कराव्या लागतात.अशावेळी चमचमीत अशी टोमॅटो शेव भाजी हा उत्तम पर्याय असतो. पोळी, भाकरी कशासोबतही छान लागणारी ही शेवभाजी सगळ्यांना आवडेल अशी असते आणि ती होतेही झटपट. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून होणारी ही भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण आवडीने खातात. शेव टोमॅटो भाजी साहित्य २ वाट्या जाडी शेव२ कांदे दोन टोमॅटो बारीक चिरलेले१ इंच आळ,आठ लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचलेला१ टेबलस्पून तेल१/२ चमचा जिरे,अर्धा चमचा मोहरी चिमूटभर हिंगअर्ध वाटी घट्ट दही१/४ चमचा हळद दोन हिरव्या मिरच्या कापलेल्या१ चमचा तिखट पाव चमचा गरम मसालाचवीनुसार मीठथोडीशी कोथिंबीर धुवून बारीक कापलेली शेव टोमॅटो भाजी कृती १. कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे. तेल गरम झालं की हिंग मोहरी जिऱ्याची खमंग फोडणी करून त्यात कांदा टोमॅटोमिरची आलं लसूण छान परतावे. मग त्यात हळद तिखट मसाला घालून परतावे. २.छान परतले की मीठ घालावं व फेटलेलं दही घालून सतत हलवत राहावं पाणी घालून छान मंद गॅसवर उकळू द्यावं. हेही वाचा >> चमचमीत आणि चविष्ठ तंदूरी पापलेट फ्राय; जबरदस्त चव कधीच विसरणार नाही, नक्की ट्राय करा ३. त्यामध्ये शेव घालून दोन मिनिटं उकळू द्यावं शेवटी कोथिंबीर घालावी. गरम गरम भाकरी चपाती पराठ्याबरोबर सर्व्ह करावं ही टोमॅटो शेव ची भाजी अतिशय सुंदर लागते