How To Make Dudhi Cutlet : दुधीची भाजी म्हंटल की, अनेक जणांना जेवायचा कंटाळा येतो. पण, दुधीच्या भाजीत अनेक प्रकारचे पोषक घटक असतात आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. त्याचबरोबर दुधी शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतो. कारण दुधी भोपळ्यात भरपूर प्रमाणात पाणी असते त्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. त्यामुळे जर तुम्हालाही दुधीची भाजी खायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही दुधीचे कुरकुरीत कटलेट बनवू शकता. तर कसे बनवायचे दुधीचे कटलेट चला जाणून घेऊ…
साहित्य
- ३०० ग्रॅम किसलेला दुधी
- १ बारीक चिरलेला कांदा
- २ हिरव्या मिरच्या
- १/२ चमचा जिरे
- १/२ चमचा हळद पावडर
- १/२ चमचा मिरची पावडर
- १/२ चमचा आले-लसूण पेस्ट
- १/२ चमचा मैदा (गरजेनुसार ब्रेडक्रंब)
- १/२ चमचा लिंबाचा रस
- मूठभर ताजी कोथिंबीर
- रवा + चिमूटभर मीठ
- तळण्यासाठी तेल
व्हिडीओ नक्की बघा…
कृती
- सगळ्यात पहिला दुधी किसून घ्या.
- किसलेल्या दुधीत कांदा, मिरची, जिरे, हळद, मसाला, आलं-लसूण पेस्ट, मैदा, लिंबाचा रस एकत्र करून मिश्रण एकजीव करून घ्या.
- तयार मिश्रणाचे छोटे-छोटे कटलेट बनवा.
- रवा + चिमूटभर मीठ असलेल्या मिश्रणात हे कटलेट बुडवुब घ्या.
- त्यानंतर तेलात कुरकुरीत तळून घ्या.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ jevayla_ye आणि @clementine.dmello या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तुमच्या घरच्या घरी व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे दुधीचे कटलेट बनवू शकता आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला खायला देऊ शकता.