कोफ्ता म्हटलं की नॉनवेज डोळ्यासमोर येतं पण तुम्ही जर व्हेजिटेरिअन असाल तर तुम्ही फ्लॉवरचे कोफ्ते ट्राय करू शकता. हे कोफ्ते जितके टेस्टी तितकेच शरीरासाठी पौष्टीक असतात. जर तुम्हाला नवीन प्रकारचे कोफ्ते बनवायचे असेल तर फ्लॉवरचे नरगिसी कोफ्ते हे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. हे नरगिसी कोफ्ते कसे बनवायचे, ही सोपी रेसिपी जाणून घेऊ या.
साहित्य
- किसलेला फ्लॉवर
- जाडसर बेसन
- पनीर
- मस्टर्ड ऑइल
- काजू पावडर
- आले व लसूण पेस्ट
- कोथिंबीर चना मसाला
- मीठ
हेही वाचा : Mix Daal Bhaji : कांदा भजी खाऊन कंटाळला आहात? मग ट्राय करा मिश्र डाळींची भजी, नोट करा ही सोपी रेसिपी
सारणासाठी साहित्य
- बारीक कापलेले आले व हिरवी मिरची,
- वेलचीची पावडर
- जाडसर कुटलेले काजू
- हळद पावडर
- धणे पावडर
- काश्मिरी मिरची पावडर
- लाल मिरची पावडर
- कांदा लांबट कापलेला
- कांद्याची पेस्ट
- गरम मसाला पावडर
- सजावटीसाठी कापलेली कोथिंबीर
- मस्टर्ड ऑइल
- मीठ.
हेही वाचा : हॉटेलसारखा कुरकुरीत समोसा आता घरीच बनवा, ही सोपी रेसिपी नोट करा
कृती
- किसलेला फ्लॉवरमध्ये बेसन, पनीर आणि काजू पावडर मिक्स करा.
- आले व हिरव्या मिरचीचे सारणासाठी मिश्रण तयार करा. छोटे-छोटे गोळे बनवा आणि त्यात आले व हिरव्या मिरचीचे मिश्रण भरा.
- प्रत्येक कोपता गरम तेलात मंद आचेवर तळा.
- एका कढईमध्ये तेल गरम करा आणि त्यात कांदा चांगल्याने तळा.
- यात कांदा व आले-लसूणची पेस्ट टाका
- त्यानंतर त्यात मसाले टाका.
- सर्व तळलेले कोपते त्यात घाला.
- थोडे पाणी टाकून मंद आचेवर शिजवा.
- शेवटी कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करा