तुम्हाला बटाटा खायला आवडतो का? मग ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही बटाट्या चकत्या किंवा काप नेहमीच करत असाल पण तुम्हाला सारखं सारखे हे खाऊन कंटाळा आला असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक हटके रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही मासे फ्राय खाल्ले आहेत का? खाल्ले नसेल तर पाहिले तर असतील. रव्यामध्ये घोळून हे मासे फ्राय केले जातात. त्याप्रमाणे तुम्ही बटाट्याच्या चकत्या रव्यामध्ये घोळून फ्राय करू शकता. ही रेसिपी चवीला अगदी अप्रतिम आणि कुरकुरीत असते.
बटाटा फ्राय
- साहित्य
- १ बटाटा
- अर्धा चमचा हळद
- मीठ
- अर्धा चमचा लाल तिखट
- छोटी वाटी रवा
- अर्धा चमचा काश्मिरी लाल तिखट
- मीठ
- तेल
हेही वाचा – संध्याकाळच्या चहासाठी झटपट बनवा मसाला बटाटा, 5 मिनिटात होईल तयार, रेसिपी येथे पहा
कृती
- सर्वप्रथम एक बटाटा घ्या. त्याची साल काढा आणि धूवून घ्या
- त्यानंतर त्याच्या गोलाकार चकत्या किंवा काप करा.
- त्यावर हळद, मीठ, तिखट टाकून एकजीव करून घ्या.
- त्यातर एका प्लेटमध्ये रवा घ्या त्यात तिखट टाका.
- रव्यामध्ये बटाट्याच्या चकत्या घोळवून घ्या.
- तापलेल्या तव्यावर तेल टाकून चकत्या दोन्ही बाजूने चांगल्या भाजून घ्या. गरज असे तर थोड तेल टाका.
- कुरकुरीत बटाटा फ्राय तयार आहे.
हेही वाचा – बटाट्याचे फ्रेंच फ्राईज खाऊन कंटाळात? मग आता घरीच तयार करा रव्याचे फ्राईज, पाहा सोपी रेसिपी
बटाट्या फ्रायप्रमाणे तुम्ही सुरण फ्राय देखील तयार करून खाऊ शकता सविस्तर रेसिपी जाणून घ्या घेण्यासाठी क्लिक करा