नाश्त्याला रोज पोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आला आहे का? तुम्हाला झटपट तयार होईल आणि काहीतरी चमचमीत खायची इच्छा असेल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक पर्याय आहे. खमंग पालक ढोकळा. साधा ढोकळा तुम्ही नेहमीच खात असाल मग एकदा हा पालक ढोकळा तयार करुन पाहा. काळजी करु नका तुम्हाल यासाठी फार व्याप करायचे नाही. अगदी सोपी आणि झटपट तयार होईल अशी पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. प्रत्येकाच्या घरामध्ये इडली पात्र असते. हेच इडली पात्र वापरुन खमंग ढोकळा कसा तयार करावा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालक ढोकळा कसा तयार करावा?

साहित्य :
एक वाटी रवा, एक वाटी साधा गव्हाचा (जाड) रवा. एक वाटी डाळीचे पीठ, एक इंच आले, चार हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, थोडा खाण्याचा सोडा, तेल, आंबट ताक, पालक, जिरे,

कृती :
प्रथम एक वाटी इडली रवा, गव्हाचा रवा व डाळीचे पीठ तिन्ही एकत्र पातेल्यात घ्यावे. त्यानंतर मिक्सरमध्ये मिरच्या, आले, मीठ, पालक, जिरे व ताक घालून वाटून घ्यावे. वरील मिश्रण पातेल्यातील पिठात टाकावे. साधरण भजीच्या पिठासारखे किंवा इडलीच्या पिठासारखे पातळ होईल एवढे मिश्रण तयार करावे. त्यानंतर पाव वाटी तेलात पाव चमचा सोडा टाकून चांगला खलून घ्यावा व ते तेल वरील मिश्रणात टाकावे व सर्व मिश्रण चांगले फेटावे. चवीपुरती साखर घालून पुन्हा चांगले फेटावे.

हेही वाचा : झणझणीत मसालेदार भरलेली भेंडी, ती पण चिकट न होता! पाहा सोपी रेसिपी

त्यानंतर थाळीला आधी तेल लावून घ्यावे व त्यावर हे मिश्रण घेऊ इडली पात्रात ही थाळी ठेवून उकडून घ्यावे. इडली पात्राचे झाकण न ठेवता ताट उपडे घालावे, त्यामुळे वाफेचे पाणी ढोकळ्यात पडत नाही. पंधरा ते वीस मिनिटे उकडू द्यावे. उकडल्यावर त्यांच्या वड्या पाडाव्यात व गार झाल्यावर त्यावर फोडणी ओतावी.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make spinach dhokla in an idli bowl instantly recipe snk