उन्हाळ्यामध्ये गृहिणींनीची वाळवणाचे पदार्थ करण्याची लगबग सुरू होते. लोणंचे, पापड, सांडगे, कुरडईची तयारी घरोघरी सुरू होते. वाळवणाची कामे फार अवघड असतात कारण त्यासाठी खूप आधीपासून तयारी करावी लागते. आता कुरडई करायची म्हटल की बाजरातून चांगला गहू आणा, तो साफ करा. तीन – चार दिवस आधी तो भिजवावा लागतो. तेवढचं नाही तर रोज सकाळ संध्याकाळ भिजवलेल्या गव्हाचे पाणी देखील बदलावे लागते जेणेकरून कुरडई तळल्यानंतर पांढरी दिसेल. गहू भिजले की मग त्याचा चिक पाडावा लागतो. त्यासाठी देखील किती व्याप असतात. घराजवळ गव्हाचा चिक काढणारी मशीन असेल ठिक नाहीतर घरात मिक्सरमध्ये गहु वाटून त्यातील चिक काढवा लागतो. त्यानंतर तो चीक गाळून घेऊ त्यातील गव्हाचा चोथा वेगळा करावा लागतो. रात्रभर गव्हाचा चीक तसाच ठेवतात. त्यानंतर सकाळी गरम पाणी चांगले उळवून घेतात आणि त्यात तयार गव्हाचा चीक टाकतात. गाठी होऊ नये म्हणून सतत चीक हटावा लागतो. गव्हाचा चिक शिजला की मग सोऱ्यामध्ये छोटे छोटे गोळे भरून त्याच्या कुरडई तयार केली जाते. या कुरडया उन्हात वाळवल्या जातात. अनेकदा गव्हाच्या ऐवजी तांदळाची कुरडई देखील केली जाते. त्यासाठी देखील तांदुळ भिजवावा लागतो. पण गहु किंवा तांदुळ न भिजवता, चिक न पाडता देखील तुम्ही कुरडई करू शकता. कसे ते जाणून घेऊ या.

हेही वाचा – झोपेतून उठताच कॉफी पिता का? आताच सोडा ही सवय! तज्ज्ञांनी सांगितले कारण…

तांदळाच्या पीठाची कुरडई कशी बनवावा?

सुरवातीला एका भांड्यात चार वाट्या पाणी घ्या. जितके पीठ आहे तितकेच पाणी घ्या. या पाण्यात २ चमचे जीरे आणि चवीपुरते मीठ टाकणून चांगली उकळी होऊ द्या. गॅस बंद करून दोन चमचे पापड खार टाका. साधरणपण २ वाटीला एक चमचा पापड खार असे प्रमाण वापरू शकता. आता त्यात तांदळाचे पीठ घाला आणि लाटणे, रवीने व्यवस्थित एकत्र करून घ्या. नंतर एका परातीमध्ये पीठ काढा. गरम असतानाच हे पीठ मळावे लागते. थोडे थोडे पीठ मळून घ्या आणि मेदूवड्यासारखे गोळे करून घ्या. एका मोठ्या भांड्यात १-२ ग्लास पाणी टाकून त्यावर एक चाळण ठेवा. चाळणीत तयार पीठाचे गोळे ठेवा आणि चांगले वाफवून घ्या. हे गोळे स्मॅशरने चुरून घ्या. थंड झाले की पीठ मळून घ्या. त्यानंतर तयार पीठाचा एक एक गोळा नीट मळून मग साच्यामध्ये टाका आणि त्याची कुरडई करा. सुती कापडावर कुरडई करा. उन्हामध्ये कुरडई चांगली वाळवून घ्या. उन्हात कुरडई वाळेलेली कुरडई हवा बंद डब्यात ठेवा. तिप्पट फुलणारी कुरडई हवी तेव्हा तळून खा. तांदळाची कुरडई चवीला देखील चांगली लागते.

हेही वाचा – उन्हाळी वाळवणाची तयारी करताय? घरच्या घरी बनवा कुरकुरीत साबुदाणा बटाटा चकली

युट्युबवर Prajaktas Kitchenया पेजवर ही रेसिपी शेअर केली आहे. तुम्ही स्वत: ही रेसिपी करून पाहा.