Immunity-Boosting Soup: पावसाळा हा बहुतेक लोकांना आवडतो. सोबतच हिरवाईच्या या मोसमात भल्याभल्यांना पावसाळ्यात चहा, गरमागरम नाश्ता करण्याचा मोह होतो.पावसाळ्यात जंतू आणि विषाणू अधिक सक्रिय होतात, ज्यामुळे रोगांचा धोका वाढतो. पावसाळ्यात खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकजण आजारी पडतात.पावसाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी हेल्दी सूप पिण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. चला तर मग पाहुयात या हेल्दी आणि टेस्टी सूपची रेसिपी

सूप साहित्य

  • १०० ग्रॅम दुधी भोपळा, ५० ग्रॅम ब्रोकोली
  • १ लसूण पाकळी, ५० ग्रॅम कांदा
  • ५ ग्रॅम चीझ, गव्हाचं पीठ व्हाईट सॉससाठी
  • ५० मिली दूध, एक चमचा लोणी
  • मिरी पावडर आणि हर्बज्

सूप कृती –

दुधी भोपळा, कांदा, लसूण आणि ब्रोकोली उकडून घ्या आणि ब्लेंडर अथवा मिक्सरमधून बारीक करून घ्या.

कढईत लोणी घेऊन बारीक आचेवर वितळवून घ्या. त्यात गव्हाचे पीठ घालून थोडे परता.कढई गॅसवरून उतरवून त्यात दूध मिसळा.

सर्व गुठळ्या फोडून घेऊन मंद आचेवर शिजायला ठेवा. हे मिश्रण सतत हलवत रहावे. त्यात चीज किसून घाला.

हेही वाचा – Palak paneer paratha: पालक पनीर पराठा, एकदा खाल तर खातच रहाल! नोट करा सोपी रेसिपी

या तयार व्हाईट सॉसमध्ये दुधी भोपळा, कांदा, लसूण आणि ब्रोकोलीची केलेली पेस्ट घालून चवीकरता मीठ, किंचित साखर, मिरी पावडर आणि ड्राइड हर्बज् घालून उकळी येऊ द्या. गरम गरम वाढा.