Khandeshi Shev Bhaji Recipe In Marathi: महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर नि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश. ‘देश तसा वेश’ असे आपण म्हणतो. तोच न्याय खाद्यसंस्कृतीलाही लागू होतो. ठसकेबाज अहिराणी भाषा, श्रमिक दिनचर्या आणि त्यालाच अनुरूप असे झणझणीत आणि झटकेदार खान्देशी जेवण. मसालेदार तिखट भाज्या, घट्ट वरण, लोणची, पापड, भजे, बोन्डे यांचे अनेक प्रकार येथे चाखायला मिळतात. चला तर मग आज जाणून घेऊया खानदेशी शेव भाजीची रेसिपी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य

  1. मध्यम आकाराचे जाड लाल शेव
  2. ३ टोमॅटो
  3. २ कांदे
  4. खोबरे, लसूण, कांदा यांचे वाटप
  5. लाल तिखट
  6. कोथिंबीर
  7. हळद
  8. कसुरी मेथी
  9. जीरे
  10. लिंबू
  11. चवीनुसार मीठ

कृती

सर्वप्रथम सुकं खोबरे, कांदा, लसूण पाकळ्या, आलं हे चांगले तेलात भाजून त्याचे वाटप बनवून घ्या.

आता गॅस चालू करून एका कढईत तेल गरम करून त्यात जीरे, कढीपत्ता, हिंग ह्यांची फोडणी करून त्यात बारीक चिरलेला कांदा, २ बारीक चिरलेले टोमॅटो घालून तेलात लालसर परतवून वरील वाटप घालून तेलात चांगले परतवून घ्या. आता वरून हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ घालून वाटप आला चांगले तेल सुटेपर्यंत परतवून घ्या.

आता त्यात आवश्यक ते नुसार पाणी घालून मिश्रण एकजीव करून त्याला एक दोन उकळी येऊ द्या.

गॅस बंद करून वरून जाड लाल शेव घालून थोडी तर्री शेव मध्ये मुरली की मिनीटभरात सर्व्ह करा…

गरमागरम झणझणीत खान्देशी शेव भाजी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून लिंबू पिळून पावासोबत सर्व्ह करा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khandeshi shev bhaji recipe in marathi dvr