Maharashtrian Style Salad Recipe : रोज वरण-भातासह भाजी खाऊन खूप वैताग येतो. अशा वेळी आपण एक तर लोणचे-पापड घेतो, भजी किंवा विविध प्रकारच्या चटणीचा आस्वाद घेतो. पण, काही वेळा हे पदार्थ खाऊनही खूप कंटाळा येतो. मग आपल्याला काहीतरी आणखी वेगळे काहीतरी खाण्याची इच्छा होते. अशा वेळी तुम्ही घरच्या घरी काकडीपासून खमंग अशी चटपटीत कोशिंबीर बनवू शकता. खाण्यास चविष्ट आणि बनविण्यास अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे. त्यात उन्हाळ्यात पोटात थंडावा निर्माण करण्यासाठी ही काकडीची कोशिंबीर अगदी उत्तम आहे. काही मिनिटांत तयार होणारा हा पदार्थ तुम्ही वरण-भात किंवा भाकरीबरोबरही अगदी सहज खाऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ काकडीची ही खमंग कोशिंबीर कशी करायची ते.

साहित्य

२ मध्यम आकाराच्या काकड्या
२ चमचे शेंगदाण्याचे कूट
१ हिरवी मिरची
१ चमचा पिठीसाखर
१ चमचा मीठ
अर्ध्या लिंबाचा रस
कोथिंबीर

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrain veg salad recipe in marathi cucumber salad khamang kakdi chi koshimbir sjr
First published on: 30-03-2024 at 17:30 IST