Crispy Paneer Chilli: पनीरपासून बनवले जाणारे पदार्थ सर्वांनाच खायला आवडतात. पण, बऱ्याचदा आपण पनीर बिर्याणी, पनीर पराठा, पनीर भाजी खातो. पण, आज आम्ही तुम्हाला क्रिस्पी पनीर चिली कशी बनवायची हे सांगणार आहोत. जाणून घेऊया पनीर चिलीसाठी लागणारे साहित्य आणि कृती…
क्रिस्पी पनीर चिलीसाठी लागणारे साहित्य:
१. २५० ग्रॅम पनीर
२. ५ चमचे कॉर्न फ्लोअर
३. १ चमचा आलं-लसूण पेस्ट
४. २-३ हिरव्या मिरच्या चिरलेल्या
५. २ चमचे चिरलेली शिमला मिरची
६. २ चमचे लाल मिरची पावडर
७. २ वाटी कांद्याची पात
८. १ चमचा साखर
९. १ चमचा सॉस
१०. २ चमचे रेड चिली सॉस
११. १ चमचा सोया सॉस
१२. २ चमचे शेझवान सॉस
१३. तेल आवश्यकतेनुसार
१४. मीठ चवीनुसार
क्रिस्पी पनीर चिली बनवण्याची कृती:
१. सर्वप्रथम क्रिस्पी पनीर चिली बनवण्यासाठी पनीरचे लांब तुकडे करा.
२. आता एका वाटीत कॉर्नफ्लोअर आणि थोडे मीठ मिक्स करा आणि थोडे पाणी घालून घट्ट द्रावण तयार करा.
३. आता या द्रावणात पनीरचे तुकडे टाका आणि चांगले मॅरीनेट करून घ्या.
४. त्यानंतर कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा व तेल गरम झाल्यावर मॅरीनेट केलेले पनीरचे तुकडे घालून तळून घ्या.
५. सोनेरी रंगाचे झाल्यावर पनीर एका प्लेटमध्ये काढून घ्या.
६. आता दुसऱ्या पॅनमध्ये थोडे तेल गरम करून त्यात आलं-लसूण पेस्ट घालून परता. त्यानंतर त्यात चिरलेली हिरवी मिरची आणि शिमला मिरची घालून शिजवा.
७. शिमला मिरची शिजल्यानंतर त्यात लाल मिरची पावडर आणि टोमॅटो सॉस, सोया सॉस, लाल मिरची सॉससह सर्व सॉस घाला आणि व्यवस्थित परतून घ्या.
८. त्यानंतर त्यात मीठ टाका आणि ग्रेव्ही चांगली शिजल्यावर त्यात आधी तळलेले पनीरचे तुकडे घालून परतून घ्या.
हेही वाचा: खास मुलांसाठी पिझ्झा पॅकेटची टेस्टी रेसिपी; पटकन नोट करा साहित्य आणि कृती
९. आता दोन मिनिटे शिजू द्या त्यानंतर त्यावर हिरव्या कांद्याची पाने घाला.
१०. तयार क्रिस्पी पनीर चिली प्लेटमध्ये काढून सर्व्ह करा.