Pizza Packets: लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना पिझ्झा खायला आवडतो. रेग्युलर पिझ्झा तर आपण नेहमीच खातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी सोप्या पद्धतीने पिझ्झा पॅकेट कसा बनवायचा हे सांगणार आहोत. जाणून घेऊया साहित्य आणि कृती…

पिझ्झा पॅकेट बनविण्यासाठी लागणारे साहित्य:

१. ३ चमचे मका
२. २ मोठे चमचे बारीक चिरलेला कांदा
३. २ चमचे शिमला मिरची
४. २-३ चमचे बटर
५. ४-५ ऑलिव्ह
६. टोमॅटो सॉस
७. ब्रेड स्लाइस (आवश्यकतेनुसार)
८. किसलेला मोझरेला चीज (आवश्यकतेनुसार)
९. पिझ्झा सॉस (आवश्यकतेनुसार)
१०. मीठ चवीनुसार

breakfast recipe
एक कप गव्हाच्या पिठापासून बनवा हा हटके नाश्ता; ही सोपी रेसिपी लगेच नोट करा
Make Gulpapadi Ladoo in just 15 minutes
अवघ्या १५ मिनिटांत बनवा गुळपापडीचे लाडू; पटकन नोट करा साहित्य आणि कृती
khandeshi recipe in marathi Matki vatana rassa bhaji recipe in marathi
१० मिनिटांत बनवा झणझणीत खानदेशी स्टाईल ‘मटकी वाटाणा रस्सा भाजी’, नोट करा सोपी रेसिपी
stuffed Shimla mirchi recipe in marathi
गावरान चमचमीत भरलेली ढोबळी मिरची; ऑफिसच्या डब्यासाठी परफेक्ट रेसिपी लगेच नोट करा
How to make Egg Sandwich Recipe at Home In Few Ingredients Note Down This Marathi Recipe Andyache Sandwich
Egg Sandwich Recipe: १५ मिनिटांत बनवा ‘अंड्याचे टेस्टी सँडविच’; साहित्य, कृती नोट करून घ्या
Murmura Chivda recipe
Murmura Chivda : कुरकुरीत मुरमुऱ्यांचा चिवडा खाल्ला का? पाहा ही सोपी रेसिपी
Vidarbha Special Recipe In Marathi Bharwan Tinda Recipe In Marathi
विदर्भाची खासियत म्हणजे चमचमीत भरवां टिंडे; वाचा सोपी मराठी रेसिपी
Masala Bhakri
Masala Bhakri : मसाला भाकरी कधी खाल्ली का? मुलांच्या डब्यात द्या पौष्टिक मसाला भाकरी, पाहा VIDEO

पिझ्झा पॅकेट बनवण्याची कृती:

१. सर्वांत आधी एका पॅनमध्ये बटर टाकून कांदा छान परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये मका, शिमला मिरची आणि मीठ टाकून परतून घ्या.

२. आता त्यामध्ये पिझ्झा सॉस आणि टोमॅटो सॉस घालून सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घ्या.

३. आता या सर्व भाज्या शिजल्यानंतर त्या एका प्लेटमध्ये काढा आणि त्यामध्ये मोझेरेला चीज आणि ऑलिव्ह ऑईल मिक्स करा.

४. त्यानंतर ब्रेडच्या चारही बाजू कापून घ्या आणि त्यात तयार केलेले मिश्रण भरून चांगले पॅक करून घ्या.

हेही वाचा: अवघ्या १५ मिनिटांत बनवा गुळपापडीचे लाडू; पटकन नोट करा साहित्य आणि कृती

५. आता कढईत तेल गरम करून स्टफ केलेले ब्रेड मध्यम आचेवर तळून घ्या.

६. पिझ्झा पॉकेट तळल्यानंतर ते सर्व एका प्लेटमध्ये काढून व टोमॅटो सॉससह सर्व्ह करा.