तुम्हाला चाट खायला आवडतो का? तुमचे उत्तर होय असेल तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठीच आहे. चाट खायला आवडतं नाही असा क्वचितच एखादा व्यक्ती असेल अन्यथा चाट पदार्थ खायला सर्वांनाच आवडते. तुम्ही आतापर्यंत पाणीपूरी, शेवपूरी, भेळपूरी असे चाट खाल्ले असतील पण आज आम्ही तुम्हाला वेगळ्या चाटची रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी आहे मसाला कॉर्न चाट. कॉर्न चाट हा खूप प्रसिद्ध आणि चविष्ट पदार्थ आहे.तुम्ही कदाचित हा चाट बाजारात गेल्यावर खाल्ला असेल किंवा पाहिला असेल. पण तुम्ही घरी कॉर्न चाट तयार केला आहे का? नसेल केला तर आता करू शकता. ही घ्या सोपी रेसिपी. ५ मिनिटांत तयार करा कॉर्न चाट.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मसाला कॉर्न चाटसाठी साहित्य
1वाटी उकडलेले स्वीट कॉर्न, १ चिरलेला कांदा, १ चिरलेला टोमॅटो, १ हिरवी मिर्ची, चाट पावडर, जिरा पावडर, लाल तिखट १ लिंबू, चीज, कोथिंबीर

मसाला कॉर्न चाटची कृती

मसाला कॉर्न चाट तयार करण्यासाठी आधी स्वीट कॉर्न एका भाड्यांत पाणी आणि थोड मीठ घेऊन त्यात टाका. चांगली वाफ येऊ द्या. त्यानंतर पाणी काढून गरमा गरमा वाफवलेले कॉर्न एका भांड्यात घ्या. त्यावर चिरलेला कादां, टोमॅटो आणि हिरवी मिर्ची टाका. त्यानंतर चाट मसाला, हिरवी मिर्ची, जीरा पावडर, लाल तिखट, टाकून सर्व मिश्रण एकत्र करुन घ्या. त्यात एक लिंबू पिळून व्यवस्थित हलवून घ्या.

हेही वाचा – बटाट्याचे फ्रेंच फ्राईज खाऊन कंटाळात? मग आता घरीच तयार करा रव्याचे फ्राईज, पाहा सोपी रेसिपी


त्यांनतर गरमा गरम कॉर्न वर चीज किसून टाका त्यावर थोडेसे लाल तिखट चिमटीने टाकावे आणि थोडी चिरलेली कोथिंबीर टाका. तुमचा मसाला कॉर्न चाट तयार आहे.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Masala corn chat easy and testy recipe snk