Matar Pakode Recipe : सध्या हिवाळा सुरू आहे. हिवाळ्यात अनेक हिरव्या भाज्या बाजारात दिसतात त्यापैकी हिरवे मटार सुद्धा अनेकांना आवडतात. अनेक जण हिवाळ्यात हिरवे कोवळे मटार आवडीने खातात. या मटारमध्ये भरपूर प्रोटीन असते हे शरीराला अधिक फायदेशीर असते. खरं तर मटार हे प्रामुख्याने थंडीत येणारे पिक आहे. अनेक भाज्यांमध्ये किंवा विविध प्रकारच्या पुलावमध्ये मटारचा उपयोग केला जातो. मटार पनीर असो किंवा आलु मटर याशिवाय मेथी, कोबी अशा अनेक भाज्यांमध्ये हिवाळ्यात हमखास मटार वापरले जातात. पण तुम्ही कधी मटारचे पकोडे खाल्ले आहेत का?

हो कुरकुरीत मटार पकोडे. हे खायला जितके स्वादिष्ट असतात तितकेच पौष्टिक असतात. आता तुम्हाला वाटेल की हे मटार पकोडे कसे बनवायचे, तर अगदी सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी १५ मिनिटामध्ये गरमा गरम हे मटार पकोडे बनवून शकता. जर तुम्हाला हे पकोडे कसे बनवतात हे जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला खालील रेसिपी लगेच नोट करावी लागेल.चला तर जाणून घ्या.

साहित्य

  • मटार
  • बेसन
  • तांदळाचे पीठ
  • जिरे
  • धनेपूड
  • बारीक चिरलेला कांदा
  • हिरवी मिरची
  • बारीक चिरलेली कोथिंबिर
  • लसूण
  • आले
  • ओवा
  • हळद
  • मीठ

हेही वाचा : कांद्याच्या पातीची भजी खाल्ली का? अप्रतिम चव अन् कुरकुरीत ही भजी नक्की खा, लगेच ही सोपी रेसिपी नोट करा

कृती

  • सुरुवातीला एका मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची, आलं, लसूण आणि मटार घालून बारीक करुन घ्या.
  • मिश्रण जास्त बारीक करू नका तर जाडसर करा.
  • या मिश्रणामध्ये एका भांड्यात काढा
  • त्यात बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबिर घाला
  • त्यानंतर त्यात हळद, धनेपूड, ओवा आणि जिरे घाला
  • त्यानंतर यात तांदळाचे पीठ आणि बेसन मिक्स करा.
  • सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घाला.
  • हे मिश्रण पाण्याने भिजवा
  • पकोड्याचं पीठ भिजवल्यानंतर गॅसवर कढई ठेवा
  • आणि कढईत तेल गरम करा.
  • गरम तेलातून मध्यम आचेवर पकोडे छान तळून घ्या.
  • तुमचे गरमा गरम पकोडे तयार होणार.
  • तुम्ही हे पकोडे तुमच्या आवडत्या चटणीबरोबर खाऊ शकता