पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि अशा वातावरणात भजे किंवा पकोडे खाण्याचा वेगळाच आनंद असतो.  तुम्ही जर हटके पण हेल्दी भजीच्या शोधात असाल तर तुम्ही सुपरटेस्टी क्रिस्पी ‘बेबी कॉर्न भजी’ नक्की ट्राय करू शकता. भजी म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर कांदा भजी, बटाटा भजी, मूगाची भजी अशी भजींचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. भजी हा पारंपरिक आणि सगळ्यांचा आवडता नाश्त्याचा प्रकार आहे. पावसाळ्यात याची चव अधिक खुलते. विविध भाज्यांना बेसनाच्या पीठात घोळवून गरमा गरम तेलात तळून खमंग भजीचा आस्वाद घेता येतो. पावसाळ्यात आपल्या सर्वत्र कणीस पाहायला मिळतात. भाजलेल्या कणसांवर चमचमीत मीठ आणि मसाला घालून त्याची चव वाढवता येते. इतकेच नाही तर आपण त्याची कुरकुरीत कॉर्न भजी देखील बनवू शकतो.

बेबी कॉर्न भजी साहित्य

बेबी कॉर्न
एक पाकीट हळद
तिखट,मीठ
गरम मसाला डाळीचे पीठ
ओवा
तांदुळ पिठी एक मोठा चमचा

बेबी कॉर्न भजी कृती

डाळीच्या पिठात एक चमचा तांदुळ पिठी घालावं

तिखट, मीठ, हळद, थोडा ओवा घालून गरम तेलाचे मोहन घालावे व पीठ भिजवून ठेवावे

सुरीने प्रत्येक बेबी कॉर्नला आतुन कट उभे कट मारून घेणे

तिखट मीठ गरम मसाला याचे मिश्रण करून चिरामध्ये पुर्ण भरुन घेणे

हे सर्व एक तासभर झाकुन ठेवणे

एक तासाने याचे निम्मे निम्मे तुकडे करून घेणे

तेल कडकडीत तापवून घेणे व मध्यम आचेवर हे तुकडे डाळीच्या पीठाच्या मिश्रणात बुडवून तळून घ्यावे.

पाहा व्हिडीओ

छान कुरकुरीत टेस्टी भाजी तयार होतात.