आतापर्यंत तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच खाल्ले असतील पण कधी मटण खिमा टोस्ट सँडविच खाल्लं आहे का ? नाही ना, मग ही रेसिपी आज नक्की ट्राय करा. रविवार आणि नॉन व्हेज हे समीकरण आपल्याला अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. बऱ्याच जणांकडे रविवारी सकाळी नॉन व्हेज घ्यायला जाणे हा घरातील एका व्यक्तीचे ठरलेले काम असते. ती व्यक्ती न कंटाळता नॉन व्हेजच्या प्रेमापायी ते काम पूर्ण करत असते. रविवारी सगळे घरी असतात. अशा वेळी जेवणाच्या निमित्ताने एकत्र बसणं, बोलणं, गप्पा मारणं होत असतं. तर तुम्हीही या रविवारी मटण खीमा टोस्ट सॅडविच ट्राय करा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मटण खीमा टोस्ट सॅडविच साहित्य

२५० ग्रॅम मटणखीमा
१/२ कप कांदा
१ टेबलस्पून आललसुण मिरची पेस्ट
१ टेबलस्पून मिक्स मसाला(मी घरचा घातलाय)
१/२ टीस्पून हळद
२ टेबलस्पून तेल
ब्रेड स्लाईस
२ टेबलस्पून बटर

मटण खीमा टोस्ट सॅडविच रेसिपी

१. सर्वात आधी खीमा धुवून निथळत ठेवणे. कांदा चिरून घेणे. आलं, लसुण, मिरची वाटण नसेल तर करून घेणे.

२. कढईत तेल गरम करत ठेवावे. तेल गरम झाले की त्यात कांदा घाला परतून घ्या. नंतर मसाले घालून परता, वाटण परतून नंतर खीमा घाला नी ५ मिनिटे परतून घ्या. बेताचे पाणी घालून कुकरमधे ३/४ शिट्या घेऊन शिजवा.

३. कुकर उघडला की थोडे पाणी राहिले असेल खीमा खालीलप्रमाणे कोरडा करून घ्या. आणि तो थोडावेळ थाळीत तिरका ठेवा म्हणजे जास्तीचे तेल निघून जाईल.

४. ब्रेड स्लाईसना एका बाजूला थोडे बटर लावून घ्या. बटरची बाजू खाली ठेऊन त्यावर खिमा पसरवावा नी वरती परत एक स्लाईस ठेवा बटर लावलेली बाजू वर ठेवा.

५. आता हे सँडविच टोस्ट सॅडविच मेकरमधे ठेवा नी टोस्ट करून घ्या.

हेही वाचा >> पावसाळ्यात असा चमचमीत मसालेदार ‘खिमा पाव’ घरी केल्यावर हॉटेलचं खाणं विसरून जाल; नोट करा सोपी रेसिपी

६. अशाप्रकारे मटण खीमा टोस्ट सॅडविच तयार आहे. मस्त साॅस बरोबर खायला खुपच छान लागते.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mutton kheema toast sandwich recipe in marathi non veg sandwich recipe in marathi srk