Rava Omelet Recipe: बऱ्याचदा लहान मुलं शिरा, उपमा हे पदार्थ खायचा कंटाळा करतात. पण रवा आरोग्यासाठी खूप पौष्टिक असतो, त्यामुळे तुम्ही रवा ऑम्लेटची ही सोपी रेसिपी बनवून मुलांना खाऊ घालू शकता. ही रेसिपी बनवण्यासाठी जाणून घेऊया साहित्य आणि कृती…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रवा ऑम्लेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • ३ कप दही
  • ३ कप रवा
  • ८-९ कडीपत्त्याची पाने
  • पाव चमचा हळद
  • ५-६ मिरच्या चिरलेल्या
  • चवीनुसार मीठ
  • तेल आवश्यकतेनुसार

रवा ऑम्लेट बनवण्यासाठी कृती:

  • सर्वात आधी रवा आणि दही एकत्र करुन घ्या.
  • त्यानंतर हे मिश्रण घट्ट असल्यास त्यात थोडे पाणी घालून पुन्हा एकदा चांगले एकजीव करुन घ्यावे.
  • आता एका भांड्यात तेल घालून त्यात मिरची, कडीपत्ता आणि हळद घालून ही तयार फोडणी त्या मिश्रणात घालावी.
  • त्यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र करुन घ्यावे.
  • नंतर एका पॅनमध्ये थोडे तेल घालून त्यात ते मिश्रण ऑम्लेट सारखे भाजून घ्यावे.
  • तयार गरमागरम रवा ऑम्लेट सॉससोबत सर्व्ह करा.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nutritional rawa omelette for childrens read the materials and recipe sap