kaju-Badam ladoo: हिवाळ्याच्या दिवसात अनेक घरांमध्ये विविध लाडू बनवले जातात. ज्यात शेंगदाण्याचे, बेसनाचे, डिंकाचे लाडू अशा विविध प्रकारच्या लाडवांचा समावेश असतो. आज आम्ही तुम्हाला काजू, बदामाच्या पौष्टिक लाडूची रेसिपी सांगणार आहोत. हा लाडू पौष्टिक असून बनवायला एकदम सोप्पा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काजू, बदामाचा पौष्टिक लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • १ वाटी काजू
  • १ वाटी बदाम
  • १/२ वाटी काळे खजूर
  • २ चमचे तूप

काजू, बदामाचा पौष्टिक लाडू बनवण्याची कृती:

हेही वाचा: एक वाटी पीठापासून बनवा नाचणीचे पौष्टिक थालीपीठ; पटकन वाचा सोपी रेसिपी

  • सर्वप्रथम काजू आणि बदामाचे बारीक काप करून घ्या. त्यानंतर खजूरातील बीयादेखील काढा.
  • आता एका पॅनमध्ये तूप टाकून काजू, बदामाचे काप मंद आचेवर २ मिनिटे परतून घ्या.
  • त्यानंतर मिक्सरमध्ये काजू, बदामाचे काप आणि खजूर वाटून घ्या.
  • हे मिश्रण एकजीव झाल्यावर त्याचे लाडू बांधा.
  • तयार पौष्टिक लाडवांचा मुलांसह आस्वाद घ्या.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nutritious ladoo of cashews and almonds quick read easy recipe sap