Palak batata recipe in marathi: रोज रोज त्याच त्याच भाज्या बनवून कंटाळा आला की जेवणाला काय वेगळं बनवानं सुचत नाही. तेच तेच खाऊन घरातील मंडळींनाही कंटाळा आलेला असतो. काय भाजी बनवावी असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर तुम्ही झटपट पालक बटाटा भाजी बनवू शकता. चपाती किवा मऊ तांदळाच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी ही भाजी उत्तम पर्याय आहे. दरम्यान तुम्हीही जर केस गळतीच्या समस्येनं त्रस्त असाल तर या भाजीचा आहारत नक्की समावेश करा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालक बटाटा भाजी साहित्य

  • एक पालक जुडी धुवून निवडून बारीक चिरुन
  • एक बटाटा बारीक काचऱ्या करून
  • दोन मिरच्या मोठें तुकडे करून ए
  • क वाटी डाळीचे पीठ
  • फोडणीचे साहित्य व हळद चार पाच लसूण पाकळ्या सोलून व तुकडे करून

पालक बटाटा भाजी कृती
प्रथम पातेल्यात थोडे तेल घालून बटाटे टाकावेत. झाकण ठेवून पाच सहा मिनीटे बटाटे अर्धवट शिजवून घ्यावेत.यानंतर बारीक चिरलेला पालक घालून परतून घ्यावे

भाजी बुडेल इतकेच पाणी घालून झाकण ठेवून पालक शिजवावा, पालक चटकन शिजतो. पालक शिजला की एक वाटी डाळीच्या पीठात पाणी व थोडी हळद घालून थोडी पातळसर पेस्ट करून घ्यावी व ती या भाजीवर ओतावी.

हे सगळे मिश्रण परत पाच मिनीटे झाकण ठेवून शिजवावे. आता एका छोट्या कढईत तेल घालून मोहरी हिंगाची फोडणी करावी. त्यात लसूण चांगला लालसर परतावा, मिरच्याचे तुकडे घालून परतावे आणि ही फोडणी शिजत असलेल्या पालक भाजीवर घालून. चवीनुसार मीठ घालून भाजी एकत्र करावी.

दोन मिनिटांनी गॅस बंद करावा.ही थोडी घट्टसर भाजी डब्यात द्यायला सुध्दा उत्तम असते.

पालेभाज्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची भाजी पालक मानली जाते. हीच पालक केसांसाठी वरदान ठरू शकते. होय, पालक हे पोषक तत्वांनी भरलेले आहे, जे केवळ तुमच्या केसांसाठीच नाही तर तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठीदेखील फायदेशीर आहे. जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने भरलेले पालक तुमच्या केसांना आवश्यक वाढ देऊ शकते.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palak batata recipe in marathi palak recipe in marathi easy tiffin bhaji recipe in marathi srk