थंडीच्या दिवसांत सतत गरमागरम काहीतरी खावसं वाटतं. नेहमीचेच चटणी, लोणचे, सलाड यापेक्षा वेगळे काहीतरी असेल तर जेवणात रंगत येते. मग जेवताना फरसाण किंवा तत्सम काहीतरी घेण्यापेक्षा मस्त हिवाळा स्पेशल पोपटी मिक्स व्हेज भाजी ट्राय करा. हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन करून खाण्याची मजा काही औरच असते. घरी असलेले टोमॅटो, हिरवे वाटाणे, गाजर आणि ओला लसूण… मस्त चटपटीत आंबटगोड भाजी तयार होते. चला तर पाहुयात याची सोपी रेसिपी…

पोपटी मीक्स व्हेज भाजी साहित्य

  • १०० ग्राम पोपटी चे दाणे
  • २ कांदे
  • २ बटाटे
  • २ टमाटे
  • ४-५ छोटी वांगी गी
  • ५-७ लसूण पाकळ्या
  • छोटा तुकडा अद्रक
  • १ हिरवि मीर्ची
  • १ मीडीयम साईज ओलं खोबरं तुकडा
  • ३-४ टेबलस्पून तेल
  • १ तेजपान
  • १ टीस्पून मोहरी,जीर
  • १ टेबलस्पून तीखट
  • १ टीस्पून हळद
  • १/२ टीस्पून हींग
  • १ टेबलस्पून गरम मसाला
  • १ टीस्पून गोडा मसाला
  • १ टेबलस्पून धणे पावडर
  • 1 टीस्पून मीठ
  • १ /२ टीस्पून गुळ पावडर/साखर

पोपटी मीक्स व्हेज भाजी कृती

स्टेप १
प्रथम सगळ्या भाजी काढून धूवून,चीरून घेणे.

स्टेप २
मिक्सरच्या जारमध्ये चिरलेले टमाटे,कांदे लसूण,अद्रक आणि ओला नारळाचा तुकडा बारीक करून टाकणे आणि याची पेस्ट बनवणे…. गॅसवर कढईत तेल गरम करणे त्यात जिरं, मोहरी टाकणे.

स्टेप ३
जिरं, मोहरी फुटली की त्यात तेजपान टाकणे…. बारीक केलेली कांदा, टमाटा,लसुन, आल्याची पेस्ट टाकणे….तेलात परतणे नी सुके मसाले टाकणे.

स्टेप ४
सगळे मसाले तेल सुटेपर्यंत परतणे…. मसाल्यात सगळ्या भाज्या टाकुन एक मिनिट परतावे.

स्टेप ५
गुळ आणि मीठ टाकावे…. पाणी टाकावे…. झाकण ठेवून मिडीयम आचेवर भाजी शिजू देणे.

हेही वाचा >> नेहमीची भाजी नाही तर बनवा झटपट चकली करी; एकदा खाल तर खातच रहाल

स्टेप ६
भाजी शिजली कि एका वाटी मध्ये काढून घेणे असल्यास वरून कोथिंबीर टाकूणे आणि सर्व करणे.