अनेकांना गोड खायला आवडतं. देशातील फेमस गोड पदार्थांपैकी एक म्हणजे मालपुवा. मालपुवा अनेकांची आवडती डिश असते. मालपुवामध्ये अनेक प्रकार आहे पण आज आपण खव्याचा मालपुवा कसा बनवायचा, हे जाणून घेणार आहोत. ही रेसिपी जाणून घ्या आणि घरच्या घरी परफेक्ट मऊ आणि लुसलुशीत मालपुवा सोप्या पद्धतीने बनवा.

साहित्य:

  • दोन कप मैदा,
  • दोन कप खवा,
  • एक वाटी साय
  • ५० ग्रॅम काजूचे तुकडे
  • तळण्यासाठी तूप
  • पिस्त्याचा चुरा
  • वेलची पूड
  • दिड वाटी साखर
  • चार कप दूध

हेही वाचा : दलिया खिचडी: ‘हॉटेल स्टाईल खिचडी’ नक्की ट्राय करा; ही घ्या चविष्ट, चवदार रेसेपी

कृती :

  • सुरवातीला काजू कोमट पाण्यात भिजत घालावेत.
  • काजू भिजल्यावर बारीक पेस्ट करावा
  • दोन कपभर दुधात खवा, काजू पेस्ट, चार टेबलस्पून साखर, वेलची पूड घालून मिश्रण करावे.
  • गॅसवर थोडे उकळावे आणि घट्ट झाल्यावर गॅस बंद करावा.
  • बाकी असलेल्या साखरीचा पाक तयार करावा.
  • दुसरीकडे मैदा, साय आणि दूध एकत्र करून भिजवावे. एका पॅनमध्ये भरपूर तूप घालावे. तेल गरम झाल्यावर पीठ घालावे व छोटे धिरडे करून दोन्ही बाजूंनी तळून घ्यावे.
  • असे सर्व पिठाचे असेच मालपुवे बनवावे आणि तयार साखरेच्या पाकात घालावेत.
  • त्यावर खव्याचे मिश्रण आणि पिस्ताकाप लावावा