Rava besan ladoo recipe in marathi: लाडू अनेकांच्या घरी बनवले जातात. कोणताही सण असो हा पदार्थ बनवणं सोयीस्कर ठरतं. अनेकांच्या घरी रवा बेसनाचे लाडू हे हमखास करण्यात येतात. मात्र, लाडू करण्याची योग्य पद्धत माहित नसल्यामुळे अनेकदा हा लाडू करण्याचा बेत फसतो. त्यामुळेच रवा बेसनाचे लाडू नेमके कसे करावेत याची कृती जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य

1 कप मिडियम रवा

1/2 कप बेसन

1 कप साखर

1/2 कप तूप

1/2 टीस्पून वेलची पूड

1 पॅक मिल्क पावडर

जायफळ आवडीप्रमाणे

पाणी

कृती

प्रथम रवा तुपावर खमंग भाजून घ्यावा.मी रवा आणि बेसन वेगळे भाजते.

नंतर बेसन पण खमंग भाजून घ्यावे आणि बाजूला ठेवा.

आता पाक करूया त्या साठी साखर बुडेल इतपत पाणी घालून हाताला चिकट लागेल इतपत पाक करावा.

रवा आणि बेसन हाताने एकजीव करून घ्यावे.

नंतर रवा आणि बेसन यांचे मिश्रण पाकात ओतावे.

पाच मिनिटांनी पाक मिश्रणात मुरल्यावर लाडू वळावेत.

तुमचे रवा बेसन लाडू तयार…

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rava besan ladoo recipe in marathi dvr