बहुतांश मासेप्रेमींना कोळंबीपासून बनवले जाणारे विविध पदार्थ खायला खूप आवडतात. अगदी छोटासा असा हा कोळंबी मासा खूपच चविष्ट असतो. त्यामुळे कोळंबी हा प्रकार वेगवेगळ्या पद्धतींनी बनवला जातो. कोळंबीचा रस्सा, कोळंबीचे कालवण, कोळंबी फ्राय, कोळंबी भात असे पदार्थ कोकणात तुम्हाला हमखास खायला मिळतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, हॉटेल्समध्ये गेल्यावर तुम्हाला कोळंबीचे आणखी काही विशेष पदार्थ चाखायला मिळतील. त्यातीलच एक खास पदार्थ म्हणजे तवा प्रॉन्स मसाला. रविवारी जेवणात काही नॉनव्हेज बनवण्याचा बेत असेल, तर तुम्ही ही डिश बनवू शकता. चला तर मग आपण झणझणीत तवा प्रॉन्स मसाला रेसिपी कशी बनवायची सविस्तर जाणून घेऊ…

साहित्य

१५-२० प्रॉन्स चे पिस

4 उभे चिरलेले कांदे

2 टोमॅटो

१५ कडिपत्याची पाने

1/4 टिस्पून हिंग

1 टेबलस्पून  आलेलसुण पेस्ट

1-2 टिस्पून  धनेजिरे पावडर

1 टिस्पून  लाल कलरचे तिखट

1-2 टेबलस्पून  घरगुती तिखट मसाला

1/4 टिस्पून  हळद

1-2 टेबलस्पून  कोथिंबीर

1 टेबलस्पून  कोकम आगळ

चविनुसार मीठ

1-2 टेबलस्पून  तेल

कृती

तवा प्रॉन्स मसाला बनवण्यासाठी पुर्वतयारी करून ठेवा. कांदे उभे चिरून, टोमॅटो चिरून, कोथिंबिर बारीक चिरून ठेवा.

लोखंडी तव्यावर गरम तेलात हिंग, कडिपत्ता, आल लसुण पेस्ट परतुन त्यात उभे चिरलेले कांदे, थोडी कोथिंबिर मीठ टाकुन परता नंतर त्यात लाल कलरचे तिखट, हळद, घरगुती तिखट मसाला धने जीरे पावडर मिक्स करा तसेच टोमॅटो मिक्स करून झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवा

नंतर त्यात प्रॉन्स व थोडी कोथिंबिर मिक्स करा व परता परत५ मिनिटे झाकण ठेवुन शिजवा नंतर कोकम आगळ व चविनुसार मीठ मिक्स करून परता व त्यातील पाणी आहे पर्यत शिजवा वरून कोथिंबिर टाका आपली डिश रेडी

प्लेट मध्ये तवा प्रॉन्स मसाला कोथिंबिर व ओलेखोबरे पसरवुन सलाद सोबत सर्व्ह करा

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tawa prawn masala recipe in marathi dvr