Palak Pulao Recipe: सकाळी मुलांसाठी डबा बनवण्यासाठी रोज नवनवीन पौष्टिक पदार्थ कोणते बनवायचे असा प्रश्न पडतो. अशावेळी तुम्ही पालक पुलावची ही सोपी रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. चला तर मग जाणून घेऊया साहित्य आणि कृती..
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
पालक पुलाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- १ वाटी तांदूळ
- १/२ जुडी पालक
- १ कांदा बारीक चिरलेला
- १ टोमॅटो बारीक चिरलेला
- १ चमचा आलं-लसणाची पेस्ट
- ४-५ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
- १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
- १ चमचा जिरं
- १ चमचा मोहरी
- चवीनुसार मीठ
- आवश्यकतेनुसार तेल
पालक पुलाव बनवण्याची कृती:
- सर्वप्रथम पालक साफ करून स्वच्छ धुवून घ्या.
- त्यानंतर एका टोपात पाणी ओतून पालक शिजवा आणि शिजलेला पालक मिक्सरमध्ये बारीक करा.
- दुसरीकडे तांदूळ स्वच्छ धुवून घ्या.
- आता कुकर गरम करून त्यात तेल ओता, त्यानंतर त्यात मोहरी, जिरं, आलं-लसणाची पेस्ट घालून परता.
- त्यानंतर त्यामध्ये कांदा, टोमॅटो, मिरच्या, पालक पेस्ट टाकून परतून घ्या.
- आता भिजवलेले तांदूळ टाकून परतून घ्या आणि त्यामध्ये गरम पाणी ओतून चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून कुकरचे झाकण लावून घ्या.
- कुकरच्या चार शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करा.
- कुकर गार झाला की प्लेटमध्ये पुलाव काढून तयार गरमा गरम पालक पुलावचा आस्वाद घ्या.
First published on: 24-04-2025 at 17:48 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiffin recipe easy recipe for quick palak pulao for kids read ingredients and recipe sap