Apple Halwa Recipe: हेल्दी राहण्यासाठी डॉक्टर नेहमी सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. सफरचंद अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. ज्यामध्ये आहारातील फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन सी, बी6, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, प्रोटीन असतात. पण आपल्याला सतत सफरचंद खाण्याचा कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही सफरचंदाचा हलवा बनवू शकता. सफरचंद हलवा चविष्ट आणि तितकाच पौष्टिकही आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सफरचंद हलवा बनवण्यासाठी साहित्य :

१. ४-५ मोठे सफरचंद
२. ३ चमचे तूप
३. ४ चमचे साखर
४. दूधाची साय
५. १ चमचा वेलची पूड
६. १ वाटी काजूचे बारीक काप
७. १ वाटी बदामाचे बारीक काप

सफरचंद हलवा बनवण्यासाठी कृती :

हेही वाचा : सणासुदीला आवर्जून बनवा ‘बाजरीची पौष्टिक खीर’; पटकन नोट करा साहित्य आणि कृती

१. सर्वात आधी सफरचंद स्वच्छ धुवून घ्या आणि त्याचे दोन काप करून त्यातील बी काढून किस करून घ्या.

२. आता कढईमध्ये तूप घ्या आणि तूप गरम झाले की, काजू बदाम तुपावर काही वेळ परतून घ्या.

३. त्यानंतर मध्यम आचेवर सफरचंदाचा किस घालून सफरचंदातील पाणी कमी होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्या.

४. १५ मिनिटांनी त्यामध्ये साखर, वेलची पूड घालून हे मिश्रण एकत्र करून घ्या.

५. त्यानंतर काही वेळाने सफरचंद हलव्यामध्ये साय घालून हे मिश्रण एकत्र करून घ्या.

६. हे संपूर्ण मिश्रण जाडसर होईपर्यंत परता आणि त्यानंतर तयार सफरचंद हलवा सर्वांना सर्व्ह करा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tired of eating apples then make a nutritious apple halwa recipe sap
Show comments