तुळशीमध्ये औषधी गुणधर्म आढळतात. अनेकदा डॉक्टर तुळशीचे पाने किंवा तुळशीच्या पानांचा रस पिण्याचा सल्ला देतात. तुम्ही कधी तुळशीच्या पानांची चटणी खाल्ली आहे का? आज आपण तुळशीच्या पानांची स्वादिष्ट चटणी कशी बनवायची, हे जाणून घेणार आहोत.

साहित्य

तुळशीचे पाने
लिंबू
पुदिन्याची पाने
मीठ
हिरवी मिरचे
कोथिंबीर
तेल
आलं

हेही वाचा : कोल्हापूर स्पेशल मिरची भजी! अशी बनवा टम्म फुगणारी मिरची भजी, ही सोपी रेसिपी नोट करा

कृती

एका भांड्यात कोथिंबीर, तुळशीचे पाने आणि पुदिन्याची पाने घ्यावी.
त्यात बारीक हिरव्या मिरच्याची तुकडे टाकावीत.
त्यात बारीक चिरलेलं आलं आणि चवीनुसार मीठ टाकावं
त्यावर थोडं लिंबू पिळून घ्यावं आणि थोडं त्यात तेल टाकावं
हे सर्व मिश्रण मिक्सरमधून बारीक करावं.
तुळशीच्या पानांची चटणी तयार होईल.