Viral Video : चपाती भाजी हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. गव्हाच्या पीठापासून बनवली जाणारी चपाती सकाळी आणि रात्रीच्या जेवणात आवडीने खाल्ली जाते. खरं तर चपातीचे अनेक प्रकार आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने चपाती बनवली जाते. तीन पदरी चपाती, दोन पदरी चपाती, तसेच तेल न वापरता केलेले फुलके इत्यादी. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेकांना तेल वापरून केलेली चपाती खूप आवडते. काही लोकांना तर तीन पदरी मऊ लुसलुशीत चपाती खूप आवडते पण बनवायला अवघड जाते. चपाती मऊ होत नाही, कडक का होतात? अशा तक्रारी आपण अनेकदा ऐकतो पण आज आपण परफेक्ट चपाती कशी बनवायची हे जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पीठ मळण्यापासून ते चपात्या बनवेपर्यंत सर्व महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक सांगितल्या आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –
१. चपाती बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीठ मळावं लागतं. पीठ मळण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो.

२. तुम्ही कधी ताटामध्ये पीठ मळू नका, कढईमध्ये किंवा खोल पातेल्यात पीठ मळा. यामुळे झटपट पीठ मळता येते.

३. चपातीसाठी पीठ चाळून घ्या. त्यात चवीनुसार मीठ टाका. थोडं थोडं पाणी टाका. आणि हळू हळू पीठ मळा.

४. काही लोकांचा समज असतो की पीठ खूप जास्त मळले की चपाती चांगली होती पण असे काही नाही.

५. तुम्ही ओबडधोबड घट्ट पीठ मळा आणि त्यानंतर त्यात खोल पाच सहा छिद्रे करा आणि त्यानंतर त्यावर थोडं पाणी शिंपडा. त्यानंतर त्यावर १५ -२० मिनिटे ओला कपडा किंवा प्लेट झाकून ठेवा.

६. १५ -२० मिनिटानंतर झाकण काढा हाताला थोडं तेल लावून पीठ पुन्हा मळून घ्या. त्यानंतर चपात्यासाठी गोळे तयार करा.

७.चपाती लाटण्यासाठी एक गोळा घ्या आणि त्याला गव्हाचे कोरडे पीठ लावा. पुरीच्या आकाराची चपाती लाटा. त्यानंतर त्यावर तेल लावा. त्यानंतर चपाती फोल्ड करा. त्यानंतर पुन्हा एकदा तेल लावा आणि त्यावर थोडं कोरडं पीठ टाका. त्रिकोणी आकाराची छोटी चपाती तयार होईल.

८. ही चपाती तुम्ही त्रिकोणी बनवू शकता किंवा लाटून गोल बनवू शकता. चपाती नेहमी हलक्या हाताने लाटावी.

९.चपाती लाटल्यानंतर चपातीवर थोडे तेल टाकावे. पहिली चपाती आहे, तव्याला चिकटू नये, म्हणून तेल टाकावे. तव्यावर सुद्धा थोडे तेल टाकावे. मध्यम ते जास्त आचेवर चपाती भाजून घ्यावी.

अशा तीन पदराची चपाती तुम्ही करू शकता. ही चपाती तुम्ही एक ते दोन दिवस मऊ लुसलुशीत राहते.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

Solapuri Tai या युट्युब अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पीठ मळण्यापासून ते चपात्या बनवेपर्यंत सर्व महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “वा मस्त चपाती अशी गरम गरम चपाती मिळाली व चहा असेल तर सोन्याहुन पिवळ” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान चपाती बनवल्या मला माझ्या आईची आठवण आली धन्यवाद ताई” आणखी एका युजरने लिहिलेय, “किती सुंदर चपाती बनवली तुम्ही पाहून असं वाटतं लगेच खावी” एक युजर लिहितो, “गहू चांगला असला तर चपाती चांगली होते.”

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video how to make 3 layering chapati read useful tips and tricks to make perfect poli ndj