Premium

महासाथ किंवा अणुयुद्धाइतकाच ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’चा धोका?

अमेरिकी कृत्रिम बुद्धिमत्ता कंपन्याच तेथील सरकारकडून ‘परवाना राज’ची अपेक्षा या क्षेत्रासाठी करताहेत…

artificial intelligence
महासाथ किंवा अणुयुद्धाइतकाच ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’चा धोका?

ओपन एआय, ‘गूगल डीपमाइन्ड’, ‘अँथ्रोपिक’ या तीन्ही कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कंपन्या… सॅम अल्टमन, डेनिस हसाबिस आणि डॅरिओ ॲमोडेइ हे या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी. हे तिघे, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील आणखी बऱ्याच उच्चपदस्थ, अधिकारी आणि अभियंत्यांसह एकत्र आले आणि मे महिन्याच्या अखेरीस एकंदर ३५० स्वाक्षऱ्यांचे निवेदन त्यांनी तयार केले. त्यात अत्यंत खरमरीत शब्दांत इशारा दिलेला होता : “झपाट्याने वाढणारे कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स – ‘एआय’) क्षेत्र हा महासाथरोग किंवा अणुयुद्ध यांच्यासारखाच मानवी समाजाला धोका आहे, हे ओळखून पावले टाकण्याची गरज आहे”!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेला आजचे प्रगत रूप दिले, तेच इतका गंभीर इशारा देताहेत ही निव्वळ एक विचित्र बातमी नव्हे अमेरिकेत कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचे नियमन करावे का, केल्यास कसे करावे याचा विचार सुरू झालेला आहे. सॅम अल्टमन, डेनिस हसाबिस आणि डॅरिओ ॲमोडेइ याच तिघांनी मे महिन्याच्या सुरुवातीस अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेऊन या धोक्यांची कल्पना दिली. त्यानंतर सिनेटच्या (अमेरिकी वरिष्ठ लोकप्रतिनिधीगृह) समितीत यावर विचार सुरू झाला.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The threat of artificial intelligence is as big as nuclear war ysh