सध्या मान्यमार (पूर्वीचा ब्रह्मदेश) आन सान स्यू की यांच्यामुळे जगभर चर्चेचा विषय असतो. तेथील लष्करशाहीचा आणि आजवरच्या इतिहासाचा आढावा घेणाऱ्या दहा उत्तम पुस्तकांची ही यादी तयार केलीय प्रवासलेखक रोरी मॅकलिन यांनी.
१) ‘अ हँगिग’ (१९३१). ब्रिटिश सरकारच्या सेवेत असलेल्या जॉर्ज ऑर्वेल यांनी ब्रह्मदेशात असताना लिहिलेला हा निबंधसंग्रह.
२) ‘द बर्मा- हीज लाइफ अँड नोशन्स’ (१८८२). याचे लेखक व स्कॉटिश पत्रकार सर जॉर्ज स्कॉट म्हणतात, ब्रह्मदेशातील माणसं लहान आहेत आणि तेथील भूतं मात्र मोठी आहेत.
३) ‘द ग्लास पॅलेस’ (२०००). भारतीय लेखक अमिताव घोष यांची ही कादंबरी इंग्रजीतील ब्रह्मदेशावरील उत्तम कादंबरी मानली जाते.
४) ‘गोल्डन अर्थ- ट्रॅव्हल्स इन बर्मा’(१९५२). ब्रिटिश प्रवास लेखक नॉर्मन लेविसने यात ५०च्या दशकातील ब्रह्मदेश चितारला आहे.
५) ‘फ्रॉम द लँड ऑफ ग्रीन घोस्टस्’ (२००२). पास्कल खू थ्वे यांचे हे आत्मचरित्र. आजी ते नातू अशा तीन पिढय़ांच्या माध्यमातून मोठे स्थित्यंतर मांडणारे.
६) ‘ब्रह्मीज क्रॉनिकल्स’  (२००७). गाय डेलिस्ले यांची ही चित्रमय कादंबरी ब्रह्मदेशातल्या लष्करशाहीतल्या कारभाराचा पंचनामा मांडते.
७) ‘फ्रीडम फ्रॉम फीअर अँड अदर रायटिंग्ज’ (१९९१). आन सान स्यू की यांचा हा लेखसंग्रह.
८) ‘द रीव्हर ऑफ लॉस्ट फूटस्टेप्स’ (२००८). थंत मियांत-यू यांनी मोठय़ा कालावधीनंतर ब्रह्मदेशाचा प्रवास करून लिहिलेल्या या पुस्तकातून सद्यस्थितीचे दर्शन होते.
९) ‘झारगाना’ हे नाव पुस्तकाचे नाही तर ब्रह्मदेशातील एका कवीचे, कार्यकर्त्यांचे आणि आघाडीच्या विनोदी नटाचे आहे. गेली वीस वर्षे कविता आणि कार्यक्रमांतून आवाज उठवणाऱ्या या कवीचा लढा हा एकाच नाही तर अनेक पुस्तकांचा विषय आहे.
१०) ‘बोन्स विल क्रो- १५ कन्टेम्पररी ब्रह्मीज पोएट’ (२०१२). यातले सर्व कवी हे अन्सेन्सॉर्ड आहेत. त्यामुळे त्यांच्या कवितांमधून त्यांच्या शब्दांची धग व्यवस्थित पोहोचते.