आपली खिडकी हाच जर आपल्या टीव्हीचा पडदा झाला तर.. हा कुठल्याही निबंधाचा विषय नाही तर अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी व हार्वर्डचा भौतिकशास्त्र विभाग, तसेच अमेरिकी लष्कराचे एडवूड केमिकल बायॉलॉजिकल सेंटर यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. त्यांनी खिडकीला लावता येईल असा प्लास्टिकचा पारदर्शक पडदा तयार केला व त्यावर हलत्या चालत्या प्रतिमा दिसू शकतात. हा एक प्रकारे टीव्ही किंवा चित्रपटाचा पडदा असून त्यात अगदी नॅनो पार्टिकल वापरले आहेत. हे अतिसूक्ष्म कण निळ्या रंगाच्या प्रकाशाचे रूपांतर द्रव बहुलकात (पॉलिमर) करतात व तो पडदा कुठल्याही खिडकीला वापरता येतो. यात नॅनो पार्टिकल आपल्याला दिसत नाहीत व त्यामुळे पारदर्शकताच राहते, पण निळ्या प्रकाशात प्रतिमा मात्र दिसतात. आम्ही या प्रयोगात नॅनो पार्टिकल चक्क त्या पॉलिमरवर ते घट्ट होण्याअगोदर ओतले असे एमआयटीचे विद्यार्थी शिया वेई सू व हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे. काही हजारांश ग्रॅम इतके नॅनो पार्टिकल हे या पडद्यातील प्रत्येक चौरस सेंटीमीटर भागात ओतले जातात. हे तंत्रज्ञान तुलनेने स्वस्तही आहे. असे असले तरी कुठलेही कण हे एकच रंग परावर्तित करीत असल्याने यातील प्रतिमा सध्या तरी एकाच रंगात दिसतात. यात बहुरंगी प्रतिमा तयार करणे शक्य आहे, पण त्यासाठी आणखी नॅनो पार्टिकल या पडद्यात ओतावे लागतील त्यामुळे पडदा अधिक अपारदर्शक होत जाईल हा धोका त्यात आहे. हा पडदा तुम्ही प्लास्टिकच्या कागदासारखा कुठेही चिकटवून त्यावर कालांतराने चित्रपट किंवा व्हिडीओ बघू शकाल असा विश्वास हू यांनी व्यक्त केला आहे. पारदर्शक पडद्याचे अनेक फायदे असतात एकतर त्याच्या मदतीने काचेवरच तुम्हाला तुम्ही कुठल्या परिसरात आहात याचा नकाशा दिसू शकतो, विमानाच्या कॉकपीटच्या खिडक्यांच्या काचांवर तुम्ही माहिती व इतर काहीही प्रक्षेपित करून बघू शकता. जाहिरातींसाठी आयग्लासेस बनवू शकतात, असेही वैज्ञानिकांचे मत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व Sci इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Window curtain to be display