Flipkart Republic Day sale 2024 : दरवर्षीप्रमाणे यंदाही फ्लिपकार्टचा रिपब्लिक डे सेल सुरू होणार असून त्याची तारीखदेखील घोषित झाली आहे. फ्लिपकार्ट ही ई-कॉमर्स कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अशा सेलमध्ये नवनवीन उपकरणांवर, साधनांवर अत्यंत आकर्षक ऑफर्स आणि डील्स देत असते. स्मार्टफोन, स्मार्ट घड्याळे, इयरफोन यांपासून लॅपटॉप, टीव्ही यांसारख्या असंख्य गोष्टींचा यामध्ये समावेश होत असतो. यंदाचा रिपब्लिक डे सेल हा सलग सहा दिवसांसाठी सुरू असणार आहे. फ्लिपकार्टच्या ऑफर्ससह निवडक बँकांच्या कार्ड्सचा वापर केल्यास अतिरिक्त सूटदेखील मिळू शकते. या सेलदरम्यान ॲपल, रियलमी, सॅमसंग, गूगल यांचे स्मार्टफोन्स सवलतीच्या दरात मिळणार असल्याचेही गॅजेट्स ३६० च्या एका लेखावरून समजते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फ्लिपकार्ट सेलची तारीख

फ्लिपकार्टचा हा सेल जानेवारी १४ या तारखेपासून जानेवारी १९ पर्यंत सुरू असणार आहे. तसेच जे फ्लिपकार्ट प्लसचे सदस्य असतील, त्यांच्यासाठी मात्र हा सेल खास एक दिवस आधी म्हणजेच, १३ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

हेही वाचा : Google Pixel 7 Pro ‘इतक्या’ रुपयांनी झाला स्वस्त! कुठे मिळतेय ही भन्नाट ऑफर; पाहा एका क्लिकवर

कोणत्या गोष्टींवर किती सूट मिळणार?

या सेलमध्ये फॅशन ॲक्सेसरीज, बूट-चप्पल इत्यादींवर ५० ते ८० टक्के सूट मिळणार आहे.
लॅपटॉप, टॅब्लेट्स, टीव्ही, इत्यादी इलेक्ट्रॉनिक्सवर ५० ते ८० टक्के सवलत मिळणार आहे.
पलंग, सोफा, गाद्यायांवर ८० टाक्यांचे डिस्काउंट उपलब्ध होणार आहे.
त्यासोबत, मायक्रोवेव्ह, मिक्सर, फ्रिज यांवर ७५ टक्के तर, सौंदर्यप्रसाधने, खेळणी यांसारख्या वस्तूंवर ८५ टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे.

ॲपल, सॅमसंग, मोटोरोला, रियलमी यांसारख्या उत्तोमोत्तम स्मार्टफोनवर ऑफर्स देण्यात येणार आहे. मात्र, त्यावर नेमकी किती टक्क्यांची किंवा किती रुपयांची सवलत असेल हे अजून उघड झालेले नाही. असे असले तरीही, ॲपल आयफोन १४, Pixel 7a यांवर भारी सूट असल्याचे म्हटले जात आहे. फ्लिपकार्टच्या बॅनरवरून Samsung Galaxy S21 FE, Motorola Edge 40 Neo, Samsung F14 5G, Realme C53, Realme 11X 5G, Moto G54 5G अशा स्मार्टफोनवर सवलत असू शकते, असा अंदाज बांधता येतो.

या रिपब्लिक डे सेलमध्ये ग्राहकांना नवीन आलेल्या Vivo X100 सीरिज, Oppo Reno 11 सीरिज, Infinix Smart 8, Redmi Note 13 Pro सीरिज, आणि Poco X6 सीरिजवरदेखील भरघोस ऑफर्स मिळणार आहे असे समजते. इतकेच नव्हे तर कॅशबॅक, एक्स्चेंज, नो-कॉस्ट ईएमआय इत्यादींसारख्या सवलती उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती गॅजेट्स ३६० च्या लेखावरून समजते.

हेही वाचा : ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर वनप्लसचा ‘हा’ फोन झाला चक्क ४००० रुपयांनी स्वस्त; काय आहेत नव्या किमती जाणून घ्या

फ्लिपकार्टच्या प्रतिस्पर्धी कंपनीने म्हणजेच ॲमेझॉननेदेखील आपला ॲमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल [Amazon Great Republic Day sale] १५ जानेवारीपासून सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2024 flipkart republic day sale get huge discounts and offers on smartphones to electronic appliances check out dha