वनप्लसच्या नॉर्ड ३ [Nord ३] या फोनच्या किमती सध्या चांगल्याच खाली आल्या आहेत. कारण – ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ऑनलाइन शॉपिंग ॲप्सवर नॉर्ड ३ या मध्यम रेंजच्या ५-G उपकरणावर थेट ४००० रुपयांची सूट देण्यात आली आहे. खरंतर वनप्लससारख्या ब्रँडवर एवढी मोठी सूट कधीही मिळत नाही. सध्या वनप्लसच्या नॉर्ड ३ ला ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्हीही ई-कॉमर्स साईट्सवर ३० हजार रुपयांखालील फोन कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आले आहेत.

वनप्लस नॉर्ड ३ या स्मार्टफोनची मूळ किंमत ही ३३,९९९ रुपये इतकी होती, मात्र सध्या ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर याच फोनची किंमत २९,९९९ रुपये इतकी असल्याचे समजते. म्हणजेच यावर थेट ४००० रुपयांची सूट दिलेली आहे. ही किंमत ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या मॉडेलसाठी उपलब्ध असल्याची माहिती, इंडिया टुडेच्या एका लेखावरून समजते.

man lose over rs 20 lakhs in fake stock market trading scams
शेअर ट्रेडींगमध्ये अधिकचा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेबावीस लाखांची फसवणूक
Vasai, Solar power, subsidy scheme,
वसई : सौर उर्जा अनुदानाची योजना कागदावरच, ६ वर्षांपासून एकालाही अनुदान नाही
ED Seizes Assets more than Rs 24 Crore from VIPS Group Owner Vinod Khute
व्हीआयपीस् ग्रुपच्या विनोद खुटे याच्याशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच, ५८ बँक खात्यातील रक्कम व ठेवींचा समावेश
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली

हेही वाचा : तुमचा फोन तुमचे बोलणे ऐकतोय का? तुम्हालाही असा प्रश्न पडला आहे का? मग एकदा ‘ही’ माहिती नक्की वाचा…

परंतु, ही ऑफर मर्यादित वेळेसाठी या साईट्सवर उपलब्ध असू शकते. सध्या तरी ही ऑफर कोणत्या तारखेपर्यंत सुरू राहील याची माहिती मिळाली नसल्याने, तुम्हाला जर हा फोन घ्यायची इच्छा असेल तर त्वरित या ऑफरचा फायदा करून घ्या. त्याआधी वनप्लस नॉर्ड ३ स्मार्टफोन घेण्याआधी त्याचे फिचर्स काय आहेत ते पाहा.

वनप्लस नॉर्ड ३ चे फिचर्स

वनप्लस नॉर्ड ३ हा एक मध्यम रेंजचा फोन आहे, जो सध्या अतिशय किफायतशीर दरामध्ये मिळतो आहे. यास ६.७ इंचाची १२०Hz AMOLED स्क्रीन असून तुम्हाला फोटो व्हिडीओ अतिशय उत्तम प्रकारे दिसू शकतात. याचे पॅनलदेखील अतिशय स्मूथ आहे. अलर्ट स्लाइडर्सच्या मदतीने तुम्ही अगदी सहज वेगवेगळ्या नोटिफिकेशन मोड्समध्ये स्वीच करू शकता.

फोनचे बेस मॉडेल हेच ८ जीबी रॅमचे असल्याने तुम्ही कोणतेही ॲप या फोनमध्ये अगदी सहज वापरू शकता. या फोनमध्ये OxygenOS१३ हे सॉफ्टवेअर आहे, जे फोन अतिशय सुरळीत चालण्यास मदत करते. याचे युआय [UI] उत्तम असून तुम्हाला हा फोन वापरताना मजा येईल.

या फोनमध्ये तुम्हाला ५,०००mAh बॅटरी मिळते, जी बराच काळ टिकून राहते. तुमचा फोन ड्रेन झाल्यानंतर त्याला झटपट चार्ज करण्यासाठी, कंपनी फोनसोबत ८०W चा चार्जरदेखील पाठवते.

हेही वाचा : फोन, लॅपटॉप किती वेगाने चार्ज होतोय हे ‘या’ केबलवरून समजणार; पाहा काय आहे याची किंमत आणि खासियत….

एकंदरीत सर्व गोष्टींचा विचार करता, वनप्लसचा नॉर्ड ३ हा स्मार्टफोन घेणे चांगले ठरू शकते.