ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन पुन्हा एकदा वादात सापडली आहे. जन्माष्टमीच्या दिवशी कंपनीकडून राधा-कृष्णाच्या आक्षेपार्ह पेंटिंगची विक्री करण्यात आल्याचा आरोप अ‍ॅमेझॉनवर करण्यात आला आहे. यानंतर अ‍ॅमेझॉन सोशल मीडियावर यूजर्सच्या निशाण्यावर आली आहे. हिंदु जनजागृती समितीनेही कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. समितीने बेंगळुरूमधील सुब्रमण्यम नगर पोलिस स्टेशनला निवेदन सादर करून अ‍ॅमेझॉनवर कारवाई करण्याची विनंती केली. तसेच, कंपनीविरोधात पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत हे आक्षेपार्ह चित्र लवकरात लवकर हटवण्याची मागणीही त्यांनी केली.

दुसरीकडे, जन्माष्टमीच्या सेलदरम्यान एक्झॉटिक इंडियाच्या वेबसाइटवरही हे आक्षेपार्ह पेंटिंग विकले जात होते. त्याच वेळी, बेंगळुरू येथील एका विक्रेत्याकडून अ‍ॅमेझॉनवर त्याची विक्री केली जात होती. त्याच वेळी, हिंदू संघटनेने नंतर एका ट्विटमध्ये दावा केला मोठा गदारोळ झाल्यानंतर आणि ट्विटरवर #Boycott_Amazon ट्रेंड करू लागल्यानंतर अ‍ॅमेझॉन आणि एक्झॉटिक इंडियाने हे पेंटिंग मागे घेतले आहे.

IND vs ZIM: राष्ट्रगीत सुरू असताना मधमाशीने केला ईशान किशनवर हल्ला; बघा काय होती त्याची रिअ‍ॅक्शन

एक्झॉटिक इंडियानेही माफी मागत ट्वीट केले की, “आमच्या वेबसाइटवर एक अनुचित आक्षेपार्ह पेंटिंग अपलोड केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. ते लगेच काढून टाकण्यात आले. आम्ही मनापासून दिलगीरी व्यक्त करतो. कृपया आमच्या विरोधात #Boycott_ExoticIndia, #boycott_exoticlndia ट्रेंड करू नका, हरे कृष्णा.’

नवी कार खरेदी केल्यानंतर त्यानं मानले आधीच्या प्रेयसीचे आभार, जुना बॉस आणि भाजीवाल्यालाही म्हणाला ‘थँक यू’; पोस्ट व्हायरल!

सध्या अ‍ॅमेझॉनने या संदर्भात कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही. त्याचबरोबर सोशल मीडियावर अ‍ॅमेझॉनवर जोरदार टीका केली जात आहे. युजर्सचे असे म्हणणे आहे की हिंदू देवी-देवतांचा जाणीवपूर्वक अपमान केला जातो. एका यूजरने लिहिले की, ‘अमेझॉनने तुम्ही काय विकत आहात ते तपासण्याची वेळ आली आहे. अन्यथा पुढच्या वेळी तुम्हाला ग्राहक मिळणार नाहीत.’ असे अनेक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अ‍ॅमेझॉन वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. अ‍ॅमेझॉनवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप यापूर्वीही अनेकदा झाला आहे. २०१९ मध्ये, अ‍ॅमेझॉनच्या अमेरिकन वेबसाइटवर हिंदू देवतांच्या आक्षेपार्ह प्रतिमा विकल्याबद्दल कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.