एलॉन मस्क हे X (पूर्वीचे ट्विटर) चे प्रमुख आहेत. त्यांनी नुकतेच ट्विटरचे नाव आणि लोगो बदलला आहे. मस्क आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवनवीन फीचर्स किंवा अपडेट लॉन्च करत असतात. आता मस्क यांच्या नेतृत्वातील X लवकरच वापरकर्त्यांसाठी आपला मोबाइल नंबर शेअर न करताच त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्यांशी कॉलवर कनेक्ट होण्याची परवानगी देणार आहे. कंपनीने नुकत्याच एका ब्लॉग पोस्टमध्ये घोषणा केली की, व्हिडीओ आणि ऑडिओ कॉल फीचर सर्व वापरकर्त्यांसाठी X वर येणार आहेत. ज्यात iOS, Android आणि डेस्कटॉप वरील वापरकर्त्यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्लॅटफॉर्मवर घोषणा करताना अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे, ”X वर व्हिडीओ आणि औडिओ कॉल येत आहे. iOS, Android , मॅक आणि पीसीवर पण काम करते. फोन नंबरची आवश्यकता नाही. X हे प्रभावी अ‍ॅड्रेस बुक आहे.” याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

हेही वाचा : VIDEO: प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी लॉन्च होणार Google Pixel 8 सिरीज, जाणून घ्या

अहवालानुसार, नवीन सुविधा डायरेक्ट मेसेज (DM) मेनूमध्ये उपलब्ध असणार आहे. तसेच व्हिडीओ कॉलिंग हा पर्याय वरील बाजूस उजव्या कोपऱ्यात असेल. नवीन DM ची रचना फेसबुक मेसेंजर आणि WhatsApp सारख्या इतर प्लॅटफॉर्म सारखी असेल. याआधी X च्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी CNBC ला दिलेल्या मुलाखतीमध्ये या बातमीची पुष्टी केली. त्या म्हणाल्या, नवीन फीचरचे उद्देश ”प्लॅटफॉर्मवर संवाद वाढवणे” आणि ”वापरकर्त्यांना एकमेकांसह कनेक्ट होण्यासाठी अधिक पर्याय देणे” आहे.

X मधील डिझाइन इंजिनिअर Andrea Conway यांनी ट्विटरवर नवीन DM मेनूचा एक फोटो देखील शेअर केला आहे. ज्यात व्हिडीओ कॉलिंग पर्याय दिसतो. हा पर्याय मेनूच्या वरील उजव्या कोपऱ्यात टेक्स्ट मेसेज, फोटो आणि व्हिडीओ पाठवण्याच्या इतर पर्यायांच्या बाजूला दिसून येत आहे.