BSNL 4G Service: बीएसएनएल ही भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन्स लॉन्च करत असते. बीएसएनएल ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. मात्र आता बीएसएनएल कंपनी आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सर्व्हिस लॉन्च करणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) लवकरच भारतात 4G सर्व्हिस लॉन्च करणार आहे. बीएसएनएलने पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यामध्ये कमर्शिअल ४ जी सेवा सुरु करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कडून काही उपकरणे खरेदी करत आहे. मागील महिन्यामध्ये कंपनीने TCS कन्सोर्टियमकडून उपकरणांसाठी तब्बल २४,५०० कोटींचा कर्ररला मंजुरी दिली आहे.

हेही वाचा : BSNL ने आणले ‘हे’ जबरदस्त फिचर, आता सेटअप बॉक्सशिवाय पाहता येणार टीव्ही

माध्यमांच्या माहितीनुसार BSNL कंपनी २०० साईट्ससाठी उपकरणे प्री-ऑर्डर करत आहे. ज्याचा सध्या सुरुवातीला वापर हा पंजाब राज्यामध्ये केला जाणार आहे. सुरुवातीला पंजाबच्या फिरोजपूर, अमृतसर आणि पठाणकोट या तीन जिल्ह्यांमध्ये ४ जी सेवा लॉन्च केली जाणार आहे. ४ जी सेवा लॉन्च करण्यासाठी BSNL च्या पायलट प्रोजेक्टचा हा एक भाग आहे. अजून टीसीएसच्या अंतिम निविदेला सरकारची मंजुरी मिळणे बाकी आहे. टीसीएसला १ लाख ४ साईट्ससाठी मार्च महिन्याच्या शेवट्पर्यंत सरकारची मान्यता मिळू शकते. कंपनी पंजाबमधून या सेवांसाठी टेस्टिंग सुरू करणार आहे.

TCS च्या मालकीच्या Tejas Networks ने आधीच सुमारे ५० साईटसाठी उपकरणे पुरविली आहेत. ज्यासाठी C-DOT (सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स) सॉफ्टवेअर पॅच अपग्रेड तैनात केले जाऊ शकते. सरकारी अधिकाऱ्यांच्या मतानुसार, मार्चच्या मध्यापर्यंत ४जी लॉन्च होण्यासाठी सुमारे १०० साईट्स तयार असण्याची अपेक्षा आहे. जर का सर्व गोष्टी प्लॅननुसार झाल्या तर, BSNL आपली ४ जी सेवा एप्रिल महिन्यात लॉन्च करू शकते.

हेही वाचा : Jio-Airtel च्या चिंतेत वाढ, BSNL ने आणला ६० दिवसांची वैधता असणारा ‘हा’ प्लॅन; जाणून घ्या

बीएसएनलने भारतात ४ जी सर्व्हिस लॉन्च केल्यानंतर त्याच्या फायद्यामध्ये २० टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय राज्यमंत्री देवुसिंह चौहान म्हणाले की, याच्या अंमलबजावणीमुळे bsnl ला २०२६-२०२७ या आर्थिक वर्षापासून फायदा होण्यास सुरुवात होईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bsnl launch 4g service in april getting equipment tcs central government tmb 01