scorecardresearch

Jio-Airtel च्या चिंतेत वाढ, BSNL ने आणला ६० दिवसांची वैधता असणारा ‘हा’ प्लॅन; जाणून घ्या

जर तुम्ही बीएसएनएलचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Bsnl News recharge Plan news
BSNL – संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

BSNL ही एक टेलिकॉम कंपनी आहे. भारत संचार निगम लिमिटेड ही सरकारी कंपनी आहे. तसेच रिलायन्स जिओ , एअरटेल , वोडाफोन आयडिया या देखील देशातील प्रसिद्ध अशा टेलिकॉम कंपन्या आहेत. या कम्पन्या आपापल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्लॅन्स लाँच करत असतात. मात्र जर तुम्ही बीएसएनएलचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बीएसएनएलने काही नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. हे प्लॅन्स कोणते आहेत ते जाणून घेऊयात.

BSNL ग्राहकांसाठी ६० दिवसांच्या वैधता असणारे नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना कमी किंमतीत इंटरनेट सुविधा आणि जास्त दिवसांची वैधता अशा सुविधा मिळणार आहेत. तुम्ही बीएसएनएल टेलिकॉम सेवा देखील वापरत असाल तर, तुमच्यासाठी हे प्लॅन खूप फायदेशीर ठरू शकतात. दोन महिन्यांसाठी तुम्ही कोणता प्लॅन शोधात असाल तर बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लॅन्सबद्दल जाणून घेऊयात.

हेही वाचा : BSNL ने आणले ‘हे’ जबरदस्त फिचर, आता सेटअप बॉक्सशिवाय पाहता येणार टीव्ही

बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत १०७ रुपये आहे. तुम्ही हा रिचार्ज केला की, तुम्हाला यामध्ये ६० दिवसांची वैधता मिळते. यापूर्वीच्या प्लॅनमध्ये ४० दिवसांची वैधता मिळत होती. तसेच BSNL ट्यून देखील तुम्ही वापरू शकता. कॉलिंगसाठी १०० मिनिटे मिळणार आहेत व सोबतच इंटरनेटचा देखील आनंद घेता येणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला ६० दिवसांसाठी एकूण ३ जीबी डेटा वापरायला मिळतो. तुम्हाला डेली डेटा वापरायला मिळत नाही. तुम्ही तुमच्या गरजेनुसार ३ जीबी डेटा वापरू शकतो. ३ जीबी डेटा संपला की तुम्हाला इंटरनेट वापरायचे असेल तर वेगळे डेटा पॅक भरावा लागणार आहे.

BSNL चा १५३ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जर तुम्ही जास्त इंटरनेट वापरत असाल तर , बीएसएनएलचा १५३ रुपयांचा रिचार्ज प्लॅन घेऊ शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि अधिकच डेटा वापरायला मिळतो.या प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता वापरकर्त्यांना मिळणार आहे. त्यात दररोज १ जीबी डेटा आणि १०० एसएमएस सुविधा देखील मिळणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 10:49 IST
ताज्या बातम्या