scorecardresearch

BSNL ने आणले ‘हे’ जबरदस्त फिचर, आता सेटअप बॉक्सशिवाय पाहता येणार टीव्ही

नवीन आणि जुने ग्राहक याचा लाभ घेऊ शकणार आहेत.

BSNL ने आणले ‘हे’ जबरदस्त फिचर, आता सेटअप बॉक्सशिवाय पाहता येणार टीव्ही
BSNL – संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

BSNL ही एक केंद्र सरकारची संस्था आहे. बीएसएनएल या कंपनीकडून IPTV(इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन) ही सर्व्हिस लाँच करण्यात आली आहे. IPTV ही सर्व्हिस Ulka टीव्ही ब्रँड अंतर्गत देण्यात येणार आहे. हा ब्रँड सिटी ऑनलाईन मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या अंतर्गत येतो. या नवीन सर्व्हिसमध्ये बीएसएनएल १००० पेक्षा जास्त टीव्ही चॅनेल्स ऑफर करणार आहे. नवीन आणि जुने ग्राहक याचा लाभ घेऊ शकणार आहेत.

या सर्व्हिसचा ग्राहकांना लाभ घेता यावा म्हणून बीएसएनएलने ऑनलाइन मीडिया प्राइवेट लिमिटेड सोबत भागीदारी केली आहे. यातून ब्रॉडबँड असणाऱ्या ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे. टेलिकॉम टॉकच्या एका रिपोर्टनुसार Ulka टीव्ही ब्रँड अंतर्गत IPTV सर्व्हिस देण्यात येणार आहे. याबद्दल कंपनी अधिक माहिती शेअर करणार आहे.

हेही वाचा : Samsung ने आकर्षक फीचर्ससह लाँच केले Galaxy A14 5G आणि A23 5G स्मार्टफोन्स, जाणून घ्या किंमत

IPTV नक्की काय आहे ?

IPTV ही एक ऑनलाईन प्रकारची सर्व्हिस आहे. युजर्स त्यांच्या टीव्ही आणि स्मार्टफोनवर कंटेंट लाईव्ह स्ट्रीम करून शकतात. बीएसएनएलसाठी ही सर्व्हिस Ulka टिव्हीकडून देण्यात येणार आहे. हे अॅप टीव्ही आणि स्मार्टफोनवर डाउनलोड करता येते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-01-2023 at 18:15 IST

संबंधित बातम्या