भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन रिचार्ज प्लॅन जाहीर केल्या आहेत. सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी BSNL म्हणते की ग्राहक १ जुलै २०२२ पासून दोन्ही नवीन प्रीपेड प्लॅन रिचार्ज करू शकतील. BSNL च्या या दोन्ही नवीन प्रीपेड प्लॅनची ​​किंमत २२८ रुपये आणि २३९ रुपये आहे. हे दोन्ही प्लॅन BSNL ने एका महिन्याच्या वैधतेसह लॉंच केले आहेत. BSNL च्या या दोन रिचार्ज प्लॅनबद्दल आम्ही तुम्हाला सर्व काही सांगू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

BSNL Rs 228 Prepaid Plan
BSNL चा २२८ STV प्लॅन १ जुलै २०२२ पासून सर्व युजर्ससाठी उपलब्ध असेल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळते. म्हणजेच ग्राहक देशभरात एसटीडी, व्हॉईस आणि रोमिंग कॉल करू शकतात. या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो. हा डेटा संपल्यानंतर वेग ८० Kbps पर्यंत घसरतो. प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस उपलब्ध आहेत. बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये प्रोग्रेसिव्ह वेब अॅपवर चॅलेंज एरिना मोबाइल गेमिंग सेवेचे सबस्क्रिप्शन देखील दिले जाते.

आणखी वाचा : Internet Banking: सुरक्षित इंटरनेट बँकिंगसाठी आवश्यक असलेल्या या टॉप ५ टिप्स जाणून घ्या

BSNL Rs 239 Prepaid Plan
२३९ रुपयांच्या BSNL प्रीपेड प्लॅनमध्ये १० रुपयांचा टॉक टाईम देखील दिला जातो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. म्हणजेच ग्राहक कोणतेही पैसे न भरता देशभरात लोकल, एसटीडी आणि व्हॉईस कॉल करू शकतात. याशिवाय या प्लॅनमध्ये २ GB डेटा उपलब्ध आहे. ग्राहक दररोज १०० एसएमएसचाही लाभ घेऊ शकतात. BSNL च्या या प्लॅनमध्ये गेमिंगचे फायदे देखील उपलब्ध आहेत. युजर्सच्या खात्यात टॉक टाइम व्हॅल्यू जोडले जाईल.

२२८ रूपये आणि २३९ रूपयांचे प्रीपेड प्लॅन एका महिन्याच्या वैधतेसह येतात. म्हणजेच जर तुम्ही महिन्याच्या १ तारखेला प्लॅन रिचार्ज केला तर तुम्हाला पुढील महिन्याच्या १ तारखेलाच रिचार्ज करावे लागेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bsnl launches rs 228 and rs 239 with 30 days validity offering unlimited voice call data prp
First published on: 29-06-2022 at 20:33 IST