BSNL Recharge Plan : भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएल (BSNL) कंपनी ग्राहकांसाठी स्वस्त आणि ऑफर्ससह रिचार्ज प्लॅन घेऊन आली आहे. दूरसंचार बाजारपेठेतील काही सर्वांत किफायतशीर पर्याय ऑफर करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या BSNL ने अलीकडेच अशा योजना उपलब्ध करून दिल्या आहेत; ज्या रिलायन्स जिओ, वोडाफोन-आयडिया (Vi) आणि एअरटेल यांसारख्या इतर दूरसंचार कंपन्यांशी उत्तम स्पर्धा करू शकतात.

बीएसएनएल प्लॅन्स हा उत्तम पर्याय का?

बीएसएनएलचा प्लॅन केवळ स्वस्त नाही, तर ग्राहकांसाठी काही फायदेदेखील घेऊन आला आहे. तसेच हे प्लॅन्स स्वस्त असण्यामागचे कारण म्हणजे BSNL वापरकर्ते अजूनही 3G नेटवर्कमध्ये काम करीत आहेत. परंतु, जिओ व एअरटेलचे ग्राहक 5G सेवांचा आनंद घेत आहेत. त्यामुळे असा अंदार्ज लावला जात आहे की, पुढील वर्षी मार्चपर्यंत बीएसएनएलकडून देशभरात 4G सर्व्हिस उपलब्ध केली जाऊ शकते.

एक वर्षाचा रिचार्ज करा आणि फ्री राहा :

ज्यांना दर महिन्याला रिचार्ज करायला कंटाळा येतो. त्यांच्यासाठी बीएसएनएलने एक उत्कृष्ट वार्षिक योजना ऑफर केली आहे; जी ३६५ दिवसांसाठी वैध आहे. ही योजना तुमची सतत रिचार्ज करण्याच्या त्रासापासून सुटका करील.

हेही वाचा…तुमच्या आवडीनुसार Jio चा मोबाईल नंबर निवडायचा आहे? फक्त ‘या’ स्टेप्स करा फॉलो; कोणासाठी असणार ‘ही’ ऑफर?

२,९९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन :

या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित लोकल, एसटीडी, रोमिंग कॉल या सेवा प्रदान करण्यात आल्या आहेत. हा प्लॅन वर्षभरासाठी कार्यरत राहणार आहे.

वापरकर्त्यांना दररोज ३ जीबी हाय-स्पीड डेटाचा फायदा होईल; जे ऑनलाइन (वर्क फ्रॉम होम) काम करतात, मनोरंजनाचे कार्यक्रम पाहतात.

दिवसाचा (दैनंदिन) डेटा जेव्हा संपेल तेव्हा मोबाईल डेटाची गती ४० केबीपीएस होईल.

त्याशिवाय दररोज १०० एसएमस, ३६५ दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध असणारा हा वर्षाचा प्लॅन मुंबई, दिल्ली MTNL क्षेत्रांमध्ये उपलब्ध आहे.

ही बीएसएनएल योजना अशा वापरकर्त्यांसाठी योग्य आहे; ज्यांना दिवसाला प्रचंड डेटा लागतो.

बीएसएनएलचे विविध प्लॅन्स :

बीएसएनएल विविध प्रकारच्या योजना ऑफर करते; ज्यांची किंमत ११ रुपयांपासून सुरू होते आणि तीन हजार रुपयांपर्यंत जाते. तुमच्या गरजेनुसार सर्वोत्तम योजना शोधण्यासाठी तुम्ही बीएसएनएलच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता आणि तुम्हाला उपयुक्त असलेल्या ऑफरचा शोध घेऊ शकता.