Delhi Metro Tickets Online: सध्या देशभरामध्ये सरकारद्वारे मेट्रोचा विस्तार मोठ्या प्रमाणात करण्याचे काम सुरू आहे. अनेक शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू झाली आहे.आता दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशन(DMRC) ने शुक्रवारी आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी एक नवीन App लॉन्च केले आहे. हे अॅप आपल्या नेटवर्कवर प्रवास करणाऱ्यांसाठी मोबाइल QR तिकीट तयार करते. दिल्ली मेट्रोने प्रवाशांच्या सेवेसाठी ‘DMRC TRAVEL’ अॅप लॉन्च केले आहे.
दिल्ली मेट्रोला रेल कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. विकास कुमार यांनी आज मेट्रो भवन येथील येथील मुख्यालयातून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या अॅपचे औपचारिक उदघाटन केले. दिल्ली मेट्रोने लॉन्च केलेल्या या नवीन मोबाइल अॅपद्वारे प्रवासी थेट त्यांच्या स्मार्टफोनवरून तिकीट खरेदी करू शकणार आहेत. आता तिकीट खरेदी करण्यासाठी तिकीट काउंटर/व्हेंडिंग मशीनवर जाण्याची किंवा रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.
हेही वाचा : Instagram वर ब्लॉक प्रोफाईलला कसे अनब्लॉक करायचे? जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स
मेट्रोने प्रवास करणारे प्रवासी आता वेगवान तिकीट प्रक्रियेचा अनुभव घेऊ शकणार आहेत. यामुळे त्यांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. हे अॅप UPI, क्रेडिट/ डेबिट कार्ड्स आणि वॉलेटसह अन्य पेमेंट करण्याच्या पर्यायांना सपोर्ट करते. ज्यामुळे वापरकर्त्यांना पेमेंट करणे सोपे होणार आहे. प्रवासी त्यांच्या पसंतीच्या पेमेंट पर्यायाने अॅपमध्ये पेमेंट करू शकतात.
तसेच याशिवाय, अॅपमध्ये ट्रॅव्हल प्लॅनर, भाडे कॅल्क्युलेटर(fare calculator), स्टेशनबद्दलची माहिती आणि स्मार्ट कार्ड रिचार्जसारख्या अन्य सुविधा मिळतात. तसेच हे अॅप इंटरचेन्ज स्टेशनसह मूळ ठिकाणापासून जायच्या ठिकाणापर्यंत पूर्ण मार्गाची माहिती देते. तसेच त्यामध्ये प्रवाशांना Transaction हिस्ट्री देखील पाहू शकतात. तसेच परतीच्या प्रवासाचे तिकीट देखील बुक करू शकतात.
‘DMRC ट्रॅव्हल’ अॅप सध्या अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असणार आहे. तसेच ते लवकरच iOS प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. DMRC ने आधीच ६० टक्क्यांपेक्षा अधिक AFC गेस्ट QR कोड स्कॅनरसह अपग्रेड केले आहेत आणि पुढील १ ते २ महिन्यांमध्ये उर्वरित AFC गेट्स QR कोडसह अपग्रेड करण्याचे डीएमआरसीचे लक्ष्य असणार आहे.
‘DMRC ट्रॅव्हल’ अॅप लॉन्च करण्यामागेचे उद्दिष्ट वापरकर्त्यांना चांगला प्रवास अनुभव मिळावा हे आहे. या App मध्ये तिकिटासाठी यशस्वीपणे पेमेंट केल्यांनतर अॅप एक मोबाइल QR तिकीट करेल. प्रवासादरम्यान प्रेवश आणि बाहेर पाडण्यासाठी प्रवाशांना हे QR तिकीट AFC ( ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन) गेटवर दाखवावे लागेल. अॅपमधील “व्ह्यू ट्रान्झॅक्शन” मेनूमध्ये खरेदी केलेली तिकीट पाहता येणार आहेत.
