सध्या भारतातील रेल्वेचे जाळे अधिक मजबूत होताना दिसत आहे. तसेच शहरी भागांमध्ये मेट्रोचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये मेट्रो सुरु झाली आहे. तसेच नवीन मेट्रो मार्गिका सुरू करण्याचे काम सुरु आहे. आता मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिल्ली मेट्रो कार्पोरेशन (DMRC) ने व्हॉट्सअ‍ॅपवर आधारित तिकीट सर्व्हिसचा अधिक विस्तार केला आहे. ही तिकीट सिस्टीम जून महिन्यामध्ये एअरपोर्ट एक्सप्रेस लाइनवर लॉन्च करण्यात आली होती. या सर्व्हिसला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे डीएमआरसीने आता गुरुग्राम रॅपिड मेट्रोसह दिल्ली- एनसीआरमधील सर्व लाइन्सवर या तिकीट सर्व्हिस सिस्टीमची सुरुवात केली आहे. ही सर्व्हिस मेटा आणि त्याची अधिकृत भागीदार असलेल्या Pelocal Fintech Pvt. Ltd च्या मदतीने सुरु केली गेली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

”व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वात जास्त लोकप्रिय असलेले मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. भारतीयांच्या अधिक आवडीचे प्लॅटफॉर्म आहे. आता मेट्रोचे तिकीट खरेदी करणे एखाद्या मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला मेसेज करण्याइतके सोपे झाले आहे. आम्हाला विश्वास आहे की, ही सिस्टीम प्रवासासाठी दिल्ली मेट्रोचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करतील.” असे डीएमआरसीचे मॅनेजिंग डायरेक्टर विकास कुमार म्हणाले.

हेही वाचा : Amazon Great Indian Festival Sale 2023: २०० मेगापिक्सलचा कॅमेरा असणाऱ्या Honor च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार ११ हजारांचा डिस्काउंट, ऑफर्स पाहाच

जूनमध्ये सुरू करण्यात आलेल्या या सिस्टीमचा फायदा परिसरातील हजारी प्रवाशांना होत आहे. मेट्रो तिकीट खरेदी करण्यासाठी प्रवाशांना +९१ ९६५०८५५८०० या नंबरवर ‘hi’ असा एक मेसेज पाठवावा लागेल. तसेच तिकीट खरेदी करण्यासाठी सोप्या पद्धतीने QR कोड देखील स्कॅन करू शकतात. वापरकर्त्यांच्या सोयीसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. ही सिस्टीम आता १२ मेट्रो लाइन्सपर्यंत पसरली आहे. ज्यामध्ये २८८ मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. तसेच प्रवासी आता घरी बसल्या बसल्या देखील तिकीट खरेदी करू शकतात.

१. या सिस्टीमचा वापर करणारा वापरकर्ता एका वेळी ६ QR तिकीट जनरेट करू शकतो.
२. सर्व मेट्रो लाइन्ससाठी सकाळी ९ ते संध्याकाळी ६६ या वेळेत तिकीट खरेदी
३. एअरपोर्ट लाइनसाठी सकाळी ४ ते रात्री ११ पर्यंत तिकीट बुक केले जाऊ शकते.
४. एकदा बुक केलेलं तिकीट रद्द करता येणार नाही.
५. डेबिट किंवा क्रेडिट कार्डावरून व्यवहार केल्यास सुविधा शुल्क आकारले जाईल.
६. युपीआय आधारित व्यवहारांवर सुविधा शुल्क लागणार नाही.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi metro rail carporation expand whatsapp ticketing service for ncr metro lines passengers tmb 01