Amazon इंडिया ही एक लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाईट आहे. यावरून खरेदीदार त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करू शकतात. या वस्तू खरेदी करत असताना त्यांना अनेक प्रकारचे डिस्काउंट आणि आकर्षक ऑफर्स मिळत असतात. तसेच कंपनी ग्राहकांसाठी अनेक प्रकारचे सेल घेऊन येत असते. अ‍ॅमेझॉन इंडियाने आपल्या आगामी फेस्टिव्हल सेल म्हणजेच ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२३ हा ८ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.  Honor 90 5G या स्मार्टफोनवर सेलमध्ये डिस्काउंट मिळणार आहे. Honor 90 5G मध्ये स्नॅपड्रॅगन ७ Gen 1 प्रोसेसर, २०० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि अन्य स्पेसिफिकेशन्स मिळतात. या ग्रेड इंडियन फेस्टिवल सेलमध्ये या स्मार्टफोनवर किती रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे डिस्काउंटनंतर हा फोन किती रुपयांमध्ये खरेदी करता येईल हे जाणून घेऊयात.

Honor 90 5G : फीचर्स

honor च्या या नवीन फोनमध्ये वापरकर्त्यांना ६.७ इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. याचे रिझोल्युशन हे १.५ के इतके आहे. तर याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. या फोनला Qualcomm स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 SoC सपोर्ट येतो. ज्यात १२८ जीबी LPDDR5 रॅम आणि २५६ जीबी इतके UFS 3.1 इनबिल्ट स्टोरेजसह जोडण्यात आपले आहे. हा फोन अँड्रॉइड १३ आधारित OS ७.१ वर चालतो.

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
Nigerian citizen, Arrested in Nalasopara, Drugs Worth 57 Lakhs, cocaine, mephedrone, drugs in nalasopara, crime in nalasopara, marathi news, crime news,
नालासोपार्‍यात ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम

हेही वाचा : फोटोग्राफर्ससाठी खुशखबर! २०० मेगापिक्सलच्या जबरदस्त कॅमेऱ्यासह Honor चा ‘हा’ स्मार्टफोन भारतात लॉन्च

तसेच Honor ९० ५जी स्मार्टफोनमध्ये २०० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. तसेच अल्ट्रा वाइड अँगलसह १२ मेगापिक्सलचा सेन्सर आणि LED फ्लॅश युनिटसह २ मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देखील या सेटअपमध्ये मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा वापरकर्त्यांना मिळणार आहे. या फोनमध्ये वापरकर्त्यांना ५००० mAh क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. यासाठी यामध्ये ६६W चा चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी यात फोन फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, NFC, GPS आणि USB टाइप-सी अशी फीचर्स यात मिळतात.

Honor 90 : डिस्काउंट आणि ऑफर्स

Amazon चा सेल ८ तारखेपासून सुरू होणार आहे. ८ ते १८ ऑक्टोबर दरम्यान या स्मार्टफोनवर फेस्टिव्हल डिस्काउंट मिळणार आहे. तसेच प्राइम सदस्य असणाऱ्यांना या सेलमध्ये ७ तारखेपासून प्रवेश मिळणार आहे. ८ ऑक्टोबरपासून सर्वांना या सेलचा आनंद घेता येणार आहे. Honor 90 चे बेस मॉडेल ज्यामध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज येते. त्या फोनवर ७००० रुपयांचा फेस्टिव्ह डिस्काउंट मिळणार आहे. याशिवाय SBI कार्ड असणाऱ्यांना ४ हजारांची अतिरिक्त सूट मिळू शकते. यामुळे या फोनची किंमत २६,९९९ रुपयांपर्यंत कमी होते. याचप्रमाणे Honor 90 च्या १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ३९,९९९ रुपये आहे. या मॉडेलवर देखील सूट मिळणार आहे. ८ ते १८ ऑक्टोबर दरम्यान या मॉडेलवर ६ हजारांचा डिस्काउंट, SBI चे कार्ड असणाऱ्यांना अतिरिक्त ४ हजारांची सूट मिळणार आहे. ज्यामुळे या मॉडेलची किंमत २९,९९९ रुपये इतकी होते.