टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क (Elon Mask) हे जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. तसेच ते त्यांच्या नवनवीन आयडियांसाठी ओळखले जातात. एलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी ट्विटरचा ताबा घेतल्यापासून अनेक जाहिरातदारांशी त्यांचा संवाद होत आहे. एलॉन मस्क हे स्पष्टवक्ते व टीकाकार म्हणून ओळखले जातात. तर अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स या माध्यमावर ज्यूविरोधी (antisemitic) मजकूर पोस्ट करण्यात आला. या मजकुराला एक्स या सोशल नेटवर्किंगचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पाठिंबा दर्शविल्यामुळे डिस्ने, ॲपलसह अनेक ब्रँड्सनी एलॉन मस्क वक्तव्याच्या निषेधार्थ करत एक्सवरून (ट्विटर) त्यांच्या जाहिराती काढल्या आहेत.
प्रकरण असे आहे की, एलॉन मस्कने डीलबुक समिटमध्ये ( DealBook Summit) त्यांच्या पोस्टबद्दल माफी मागितली आहे आणि पुन्हा जाहिरातदारांवर टीका करून, त्यांना ब्लॅकमेलर म्हटले आहे. एलॉन मस्कने सांगितले की, ‘जर ब्रॅण्ड्सना माझ्या प्लॅटफॉर्मवर जाहिरात करायची नसेल, तर त्यांनी करू नये’. न्यूयॉर्क टाइम्सशी झालेल्या संभाषणात एलॉन मस्क म्हणाले, जर कोणी मला जाहिराती बंद करून मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्यांनी मला पैसे देऊन ब्लॅकमेल करा’ अशा शब्दांत त्यांनी टीका केली आणि पुढे ते म्हणाले, जाहिरातीचा बहिष्कार प्लॅटफॉर्मला हानी पोहोचवेल याची चांगली जाणीव आहे. जर प्लॅटफॉर्म बंद झाला, तर संपूर्ण जगाला कळेल की, त्या जाहिरातदारांनी कंपनीची हत्या केली.”
हेही वाचा…भारत सरकारने ‘एवढे’ मोबाईल नंबर केले डिस्कनेक्ट! जाणून घ्या तुमचे नंबर सुरक्षित ठेवण्याचे ‘हे’ उपाय…
विशेष म्हणजे एलॉन मस्कचे हे सडेतोड उत्तर डिस्नेचे सीईओ बॉब इगर यांना होते. डिस्नेचे सीईओ बॉब इगर यांनी यापूर्वी शिखर परिषदेदरम्यान सांगितले होते, “एक्स (ट्विटर)सह डिस्नेची पार्टनरशिप आता त्यांच्या कंपनीला सकारात्मक फायदे देत नाही. मला एलॉनबद्दल आणि त्याने काय साध्य केले याबद्दल आदर आहे. आम्हाला माहीत आहे की, एलॉन अनेक बाबतीत लार्जर दॅन लाइफ आहे आणि त्याचे नाव त्याने स्थापन केलेल्या किंवा मालकीच्या कंपन्यांशी खूप जोडलेले आहे. सार्वजनिकरीत्या त्याने घेतलेले स्थान घेऊन, आम्हाला असे वाटले की, असोसिएशन आमच्यासाठी सकारात्मक असेलच, असे नाही.” डिस्नेचे सीईओ बॉब इगर आणि इतर जाहिरातदारांना एक्सकडे (ट्विटर) पाठ फिरवण्याचे संकेत देताना मस्क म्हणाला, “जे माझा तिरस्कार करतात आणि जे अँटीसेमिटिक आहेत त्यांना मी एक लोडेड बंदूक दिली आहे आणि त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आहे.”
एलॉन मस्कच्या अँटीसेमिटिक पोस्टनंतर डिस्ने, ॲपल व आयबीएम (IBM) यांसारख्या मोठ्या जाहिरातदारांनी एक्स (ट्विटर)वर जाहिरात देणे थांबवले आहे. ज्यू समुदायांवर ‘हाट्रेड अगेन्ट्स व्हाइट्स’ (hatred against whites) गोऱ्या लोकांविरुद्ध द्वेषाचा आरोप करणाऱ्या पोस्टचा निषेध करण्यात आला आणि प्रख्यात ब्रॅण्डने एक्स (ट्विटर)वर बहिष्कार टाकण्यास सांगितले. या जाहिरातदाराच्या बहिष्कारामुळे ७५ दशलक्ष डॉलरचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. जाहिरातदारांव्यतिरिक्त ज्या गुंतवणूकदारांनी मस्कला संपादनासाठी अब्जावधी डॉलर्सची ऑफर दिली तेदेखील मस्कच्या भूमिकेमुळे नाराज असू शकतात. कारण- जाहिरातदारांनी ट्विटरवर बहिष्कार टाकल्याने सर्व काही उघड झाले आहे. एक्स (ट्विटरच्या) कमाईचा बहुतांश भाग जाहिरातींचा आहे.