scorecardresearch

Premium

भारत सरकारने ‘एवढे’ मोबाईल नंबर केले डिस्कनेक्ट! जाणून घ्या तुमचे नंबर सुरक्षित ठेवण्याचे ‘हे’ उपाय…

तुमचा फोन नंबर सुरक्षित कसा ठेवायचा? यासंबंधित काही महत्वाच्या टिप्स पाहू

The Indian government has disconnected 70 lakh mobile numbers read this solutions to keep your numbers safe
(फोटो सौजन्य: लोकसत्ता.कॉम) ओपन एआयमधून काढून टाकलेले सॅम ऑल्टमन मायक्रोसॉफ्टमध्ये परत!

दिवसेंदिवस ऑनलाइन घोटाळे आणि आर्थिक फसवणुकीत वाढ होत आहे. देशभरातील असंख्य नागरिक स्कॅमरच्या योजनांना बळी पडत आहेत. अलीकडच्या काही महिन्यांत, ऑनलाइन फसवणुकीदरम्यान नागरिकांना लाखो किंवा अगदी कोटी रुपयांचा फटका बसला आहे. या वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी भारत सरकारने सायबर गुन्हे किंवा आर्थिक फसवणुकीत गुंतलेले ७० लाख मोबाईल नंबर ब्लॉक करण्याचे एक निर्णायक पाऊल उचलले आहे. हा उपाय फसवणूक रोखण्यासाठी मदत करू शकतो. या प्रयत्नांमध्ये इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिफाय (IMEI) ब्लॉक करणे, मोबाईल उपकरणांचे आयडेंटिफायर आणि खात्यांमधून पैसे काढण्यावर निर्बंध घालणे आदी गोष्टी समाविष्ट आहेत. भविष्यातील घोटाळे आणि आर्थिक फसवणूक रोखणे हा यामागचा उद्देश आहे.

आरबीआय (RBI), टीआरएआय (TRAI), एनपीसीआय (NPCI) व आयटी (IT) मंत्रालयाच्या अधिकार्‍यांसह नुकत्याच झालेल्या बैठकीदरम्यान असे दिसून आले की, डिजिटल इंटेलिजेन्स प्लॅटफॉर्मद्वारे नोंदवल्याप्रमाणे सायबर गुन्ह्यांशी किंवा आर्थिक फसवणुकीशी संबंधित सात दशलक्ष मोबाइल कनेक्शन्स आजपर्यंत निष्क्रिय करण्यात आली आहेत.

Infosys Narayana Murthy Consumer Brand
Narayan Murthy: ”लोकांना वाटते त्यांच्याकडे विशिष्ट फोन अन् घड्याळ असेल तर…,” नारायण मूर्तींनी यशस्वी ब्रँडसाठी दिल्या महत्त्वाच्या टिप्स
Gyanvapi Case
ज्ञानवापी प्रकरण : प्रार्थनास्थळांवरील कायदा अन् त्याच्या समोरील आव्हाने
bombay hc refuse to stop manoj jarange patil protest
मनोज जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखण्यास HC चा नकार; सदावर्तेंची मागणी फेटाळली, राज्य सरकारला दिले महत्त्वाचे आदेश
can your routine blood tests indicate a risk of heart attack but how to read your blood reports correctly and take corrective measures
नियमित रक्ताच्या चाचण्यांमुळे हृदयविकारचा धोका लक्षात येतो का? चाचण्यांचे रिपोर्ट समजून घ्यायचे कसे? डॉक्टर म्हणाले…

तर फसव्या सिम क्रमांकांवर कारवाई करण्याचे सकारात्मक पाऊल उचलण्यात आले असले तरीही तुमचा फोन नंबर व डिव्हायसेसचे रक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमचा फोन नंबर सुरक्षित कसा ठेवायचा? यासंबंधित ‘पाच’ महत्त्वाच्या टिप्स :

१. सिम स्वॅपिंग :

सिम स्वॅपिंगमध्ये (Sim swapping) स्कॅमर तुमचा फोन नंबर त्यांच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी तुम्हाला तुमचा नंबर नवीन सिम कार्डवर स्विच करण्यासाठी तुम्हाला पटवून देतात. फसवणूक करणाऱ्यांनी एकदा तुमच्या नंबरवर नियंत्रण मिळवले की, ते पासवर्ड रिसेट करण्यासाठी आणि तुमच्या खात्यांमध्ये अनधिकृत प्रवेश मिळवण्यासाठी त्याचा वापर करू शकतात. सिम स्वॅपिंगपासून संरक्षण मिळवण्यासाठी व सिम कार्डमधील कोणतेही बदल करताना पिन किंवा पासवर्ड सेट करणे उचित राहील.

२. लिंक्स आणि मेसेजेस :

तुमच्या मोबाईलवर लिंक्स क्लिक करताना किंवा मेसेजला रिप्लाय देताना सावधगिरी बाळगा. विशेषत: ते तुमच्या बँक, सरकारी संस्था किंवा इतर विश्वासू संस्थांकडून असल्याचा दावा करतात. लॉगिन क्रेडेन्शियल्स किंवा वैयक्तिक माहिती यांसारखी संवेदनशील माहिती काढून घेण्यासाठी ते व्यक्तींना अनेकदा फसवे संदेश पाठवतात. कोणतीही कार्यवाही करण्यापूर्वी नेहमी मेसेज तपासा आणि असुरक्षित संस्थांना तुमची वैयक्तिक माहिती सांगणे टाळा.

३. व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस :

स्कॅमर व्हॉट्सअ‍ॅपसारख्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर अनेकदा वापरकर्त्यांना फसवण्यासाठी करतात. एखाद्या मित्र किंवा विश्वसनीय स्रोताकडून असल्याचा दावा करून हे स्कॅमर संदेश पाठवू शकतात आणि तुम्हाला लिंकवर क्लिक करण्यासाठी किंवा पर्सनल माहिती शेअर करण्यास प्रोत्साहित करू शकतात. असे घडल्यास सगळ्यात पहिल्यांदा मेसेज पाठवणाऱ्याची ओळख पटवून घ्या आणि संशयास्पद मेसेज आल्यास संवाद करणे टाळा.

हेही वाचा…ॲपल वॉचची बॅटरी सारखी ड्रेन होत आहे? watchOS 10.1 अपडेट नंतर ‘हे’ जुगाड करून पाहा…

४. तुमची पर्सनल माहिती सुरक्षित करा :

तुमच्या पर्सनल माहितीचे संरक्षण करणे अगदी महत्त्वाचे आहे. संदेश किंवा कॉलद्वारे तुमचे पर्सनल पासवर्ड किंवा पिन शेअर करणे टाळा. तुम्ही सोशल मीडियावर शेअर करीत असलेल्या माहितीची काळजी घ्या. कारण- स्कॅमर सोशल मीडियावरील तुमचा उपलब्ध डेटासुद्धा वापरू शकतात.

५. नियमितपणे तुमच्या खात्यांचे निरीक्षण करा :

तुमचे बँक स्टेटमेंट, मोबाईलचे बिल आणि इतर आर्थिक खात्यांवर बारीक नजर ठेवा. तुम्हाला कोणतीही संशयास्पद गोष्ट दिसल्यास, तत्काळ संबंधित सर्व्हिस प्रोव्हायडरला कळवा. वेळेत तक्रार किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरला कळवल्यास नुकसान कमी होण्यास मदत होऊ शकते

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The indian government has disconnected 70 lakh mobile numbers read this solutions to keep your numbers safe asp

First published on: 30-11-2023 at 14:56 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×