Elon Musk बनले ट्विटरवर सर्वाधिक फॉलोवर्स असणारे व्यक्ती, अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांना टाकलं मागे

जस्टिन बीबर या यादीमध्ये तिसऱ्या तर कॅटी पेरी चौथ्या स्थानावर आहेत.

twitter ban 6.80 lakh indian accountas
ट्विटरने भारतीय अकाउंट्सवर घातली बंदी (Image Credit- loksatta graphics Team)

Elon Musk यांनी ट्विटरची खरेदी केल्यापासून सातत्याने ते चर्चेत राहत आहेत. मस्क यांनी ४४ अरब डॉलरमध्ये ट्विटरची खरेदी केली होती. आता आणखी एका कारणामुळे एलॉन मस्क हे चर्चेत आले आहेत. एलॉन मस्क हे ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केले जाणारे व्यक्ती ठरले आहेत. या शर्यतीमध्ये त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही मागे टाकले आहे. एलॉन मस्क हे ट्विटरचे सीईओ होताच ते चर्चेमध्ये आले होते. त्यानंतर कंपनीमध्ये सातत्याने काही बदल करत आहेत. जसे की कर्मचाऱ्यांची कपात,आणि ट्विटरवर ब्ल्यू टिकचे सब्स्क्रिप्शन सुरु केले आहे.

सध्या ट्विटरवर एलॉन मस्क यांच्या फॉलोअर्सची संख्या १३३,०९१,५७५ इतकी आहे. यासह, ते सध्या ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्सच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहेत. तर बराक ओबामा यांचे नाव या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे ट्विटरवर १३३,०४२,२२१ इतके फॉलोवर्स आहेत. एलोन मस्क यांनी बाराक ओबामा यांच्यानंतर २ वर्षांनी ट्विटर जॉईन केले होते. बराक ओबामा यांनी २००७ मध्ये तर एलॉन मस्क यांनी २००९ मध्ये ट्विटर जॉईन केले होते.

हेही वाचा : Google ची एक चूक अन् भरावा लागणार १,३३८ कोटींचा दंड; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

एलॉन मस्स्क यांनी १ एप्रिल पासून जगभरात LegacyBlue बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठ मस्क यांनी अजून एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी जाहीर केले आहे की, १५ एप्रिलपासून केवळ जे अकाउंट व्हेरीफाईड आहे त्यांनाच ‘For You Recommendations’ या फीचरचा फायदा मिळणार आहे. याशिवाय ट्विटर पोलमध्ये सुद्धा ते वापरकर्ते वोट करू शकणार आहेत ज्यांचे अकाउंट हे व्हेरीफाईड आहेत.

एलॉन मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, १५ एप्रिलपासून फक्त व्हेरीफाईड अकाउंट्स असणारे वापरकर्तेच For You Recommendations या फीचरचा वापर करू शकणार आहेत. अत्यंत वेगाने विकसित होणाऱ्या AI Bot ला रोखण्यासाठी हा एकमात्र उपाय आहे. ट्विटरवर होणाऱ्या पोलसाठीसुधा व्हेरिफाइड अकाउंट असणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 19:20 IST
Next Story
Redmi 12C, Redmi Note 12 4G झाले लॉन्च; ५००० mAh ची बॅटरी आणि ५० मेगापिक्सलचा कॅमेरा, किंमत फक्त…
Exit mobile version