फेसबुक वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी, Facebook मध्ये होणार मोठे बदल, 'या' सेक्शनला कायमचं हटवणार | Loksatta

फेसबुक वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी, Facebook मध्ये होणार मोठे बदल, ‘या’ सेक्शनला कायमचं हटवणार

फेसबुकच्या प्रोफाईल सेक्शनमधून लवकरच काही महत्वाच्या गोष्टींना हटवण्यात येणार आहे

Facebook latest News
FB

Facebook Update: दैनंदिन जीवनातील महत्वाचं सोशल मीडिया माध्यम म्हणून जगभरात लोकप्रिय असलेल्या फेसबुक अॅपमध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. फेसबुकच्या प्रोफाईल सेक्शनमधून लवकरच काही महत्वाच्या गोष्टींना हटवण्यात येणार आहे. यामध्ये जात, राजकीय विश्लेषण, पत्ता आणि इंटरेस्टेड इन यांचा समावेश आहे. फेसबुकने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी या बदलांबाबत सूचना देण्याचं काम सुरु केलं आहे. रिपोर्टनुसार, फेसबुक प्रोफाईलमध्ये हे बदल १ डिसेंबरपासून पाहायला मिळतील. फेसबुक अकाउंटमध्ये बायो आणि प्रोफाईल सेक्शमध्ये या सर्व गोष्टी काही वापरकर्ते लपवूनही ठेवतात. म्हणजेच ओनली सेक्शनला मार्क करतात.

नक्की वाचा – बापरे! दहा दिवसांपासून शेकडो मेंढ्यांचा कळप सर्कलमध्येच फिरतोय, नेमकं काय घडलंय? चीनचा Video होतोय तुफान Viral

१ डिसेंबरपासून होणार बदल

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक १ डिसेंबरपासून Intrested In (महिला किंवा पुरुष) आणि धार्मिक विचारसरणीच्या सेक्शनला बंद करणार आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यापासून फेसबुक वापरकर्त्यांना ही सर्व माहिती त्यांच्या प्रोफाईलमध्ये दिसणार नाहीय.

फेसबुकमध्ये होणाऱ्या या सर्व बदलांबाबत सर्वात आधी सोशल मीडिया कंसल्टेंट Matt Navarra ने स्पॉट केलं आहे. मॅट नवरा यांनी त्यांच्या ट्विटर हॅंडलवरून एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. याबाबत कंपनीकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आली नाही. पण, मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सोप्या पद्धतीने वापरण्यासाठी हे बदल करण्यात येणार आहेत.

तुमची माहिती डाउनलोड करु शकता

फेसबुकच्या माध्यमातून तुमची माहिती तुम्ही डाऊनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला अबाऊट सेक्शनमध्ये जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला बेसिक इंफॉर्मेशनमध्ये जाऊन या डिटेल्सला डाऊनलोड करायचं आहे.

या कारणामुळं फेसबुकमध्ये होणार बदल

रिपोर्ट्सनुसार, फेसबुकने त्यांच्या प्लॅटफॉर्मला सोपं करण्यासाठी प्रोफाईल सेक्शनमधून या डिटेल्सला काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आताही फेसबुकमध्ये खूप साऱ्या अशा डिटेल्स आहेत, ज्यांचा वापर आता केला जात नाहीय. नवीन प्लॅटफॉर्म जसे Instagram आणि Tik Tok मध्ये हे पाहायला मिळत नाही. नवीन प्लॅटफॉर्मचा बायो खूप सोपा आहे. यामध्ये युजर मोजकीच माहिती देऊ शकतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-11-2022 at 19:35 IST
Next Story
खुशखबर! ‘ही’ कंपनी देणार दररोज 2GB डेटासह डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी मोफत; जाणून घ्या भन्नाट प्लॅन