Who earns what salary at Google: H-1B व्हिसाशी संबंधित अलिकडच्या वादामुळे अमेरिकेतली काही प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांना त्यांच्या कर्मचारी धोरणांवर पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे. H-1B व्हिसा अर्जदारांवरील लादलेल्या नवीन शुल्कामुळे मायक्रोसॉफ्ट आणि इतर प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांप्रमाणे गुगललाही विद्यमान व्हिसाधारक कर्मचाऱ्यांच्या अर्जांचे नूतनीकरण करावे लागत आहे. ही प्रक्रिया काही तंत्रज्ञान भूमिकांसाठी कर्मचाऱ्यांचे पगार उघड करत आहे.

बिझनेस इनसाइडरने शेअर केलेल्या वर्क व्हिसा अर्जांच्या अलिकडच्या विश्लेषणातून गुगल कर्मचाऱ्यांची प्रत्यक्षात किती कमाई आहे हे उघड झाले आहे. यामध्ये विविध टप्प्यांवरील विविध पदांवरील कर्मचाऱ्यांच्या मुलभूत पगाराबाबतची माहिती उघड झाली आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ लेबरकडे दाखल केलेल्या अधिकृत H-1B व्हिसा अर्जांमधून मिळवलेला पगाराचा डेटा, गुगलमधील विशिष्ट पदांसाठी परदेशी कर्मचाऱ्यांना दिले जाणारे मूळ वेतन दर्शवतो. या आकडेवारीमध्ये परफॉर्मन्स बोनस, स्टॉक ऑप्शन्स किंवा इतर आकर्षक फायदे यासारख्या अतिरिक्त मोबदल्याचा समावेश नसला तरी, ती कंपनीच्या पगार रचनेची मुलभूत माहिती समोर आणते.

नेमका काय डेटा उघड झाला?

उघड झालेल्या पगाराच्या आकडेवारीवरून गुगल त्यांच्या टेक कर्मचाऱ्यांना, एन्ट्री लेव्हल इंजिनिअर्सपासून ते अनुभवी नेत्यांपर्यंत किती महत्त्व देते हे अधोरेखित होते. तसंच पद, वरिष्ठतेची पातळी यानुसार पगारातही लक्षणीय बदल होतात असंही यावरून स्पष्ट होतं.

पदवार्षिक वेतन सीमा
सॉफ्टवेअर इंजिनिअर३.३५ करोड रूपयांपर्यंत
इंजिनिअरिंग मॅनेजर८.८७ करोड रूपयांपर्यंत
सॉफ्टवेअर इंजिनियर एल-७१.७७ ते २.६६ करोड रूपयांपर्यंत
सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर२.६६ करोडहून अधिक
यूएक्स डिझाइनर१.६८ ते १.९६ करोड रूपयांपर्यंत
रिसर्च सायंटिस्ट१.५९ ते २.३० करोड रूपयांपर्यंत
प्रॉडक्ट मॅनेजर २.२१ ते २.८३ करोड रूपयांपर्यंत
डेटा सायंटिस्ट१.४१ ते १.९५ करोड रूपयांपर्यंत
टेक्निकल प्रोग्राम मॅनेजर१.६८ ते २.२१ करोड रूपयांपर्यंत
सॉफ्टवेअर इंजिनिअर, एल-६१.५९ ते १.९५ करोड रूपयांपर्यंत
हार्डवेअर इंजिनिअर१.५९ ते २.०४ करोड रूपयांपर्यंत
क्लाउड आर्किटेक्ट१.५० ते १.६८ करोड रूपयांपर्यंत