व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. यावरून तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकता. व्हॉट्सअ‍ॅपची मूळ कंपनी मेटा आहे. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमीच नवनवीन फीचर्स लॉन्च करत असते. व्हॉट्सअ‍ॅपने आता भारतासह १५० देशांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप चॅनल्स लॉन्च केलं आहे. WhatsApp ने या नवीन अपडेटमध्ये एक भन्नाट फिचर दिले आहे. जे तुम्हाला अ‍ॅपमध्येच तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या, तुमच्या आवडीच्या लोकांना आणि संस्थांना फॉलो करण्याची सुविधा उपलब्ध करुन देत आहे. शिवाय तुम्हाला या लोकांशी आणि संस्थांशी संबंधित अपडेट मिळू शकणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅप चॅनल्स नावाचे हे एकतर्फी प्रसारण साधन असणार आहे, जे तुमचे कुटुंबीय, मित्र किंवा समुदाय यांच्यासह तुमच्या चॅट्सपासून वेगळे असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतासह आणि जगभरातील काही सेलिब्रिटी, क्रिकेटपटू आणि कलाकार WhatsApp वर आधीपासूनच उपस्थित असतील. ज्यांना तुम्ही फॉलो करु शकणार आहात. WhatsApp चॅनेल उपलब्ध सर्वात खाजगी प्रसारण सेवा म्हणून डिझाइन केले आहेत. चॅनल्स फॉलोअर म्हणून, तुमचा फोन नंबर आणि प्रोफाइल फोटो किंवा इतर फॉलोवर्सच्या दाखवला जाणार नाही. हे नवीन फीचर अँड्रॉइड आणि iOS वापरकर्त्यांसाठी रोल आऊट करण्यात आले आहे.

हेही वाचा : व्हॉट्सअ‍ॅपचं भन्नाट फिचर! WhatsApp Channels द्वारे आता तुम्ही आवडत्या सेलिब्रिटींना फॉलो करु शकता, कसं ते जाणून घ्या

जर का तुम्हाला चॅनेल्स फीचरचा वापर करायचा नसेल किंवा त्याचा तुम्हाला काही उपयोग नसेल तर हे फिचर कसे लपवायचे (Hide) करायचे हे जाणून घेऊयात. जर का तुम्ही तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अपडेट केले नसेल तर तुम्ही चॅनेल्स फीचरशिवाय व्हॉट्सअ‍ॅपचे जुने व्हर्जन अँड्रॉइडवर वापरू शकता. मात्र जर का तुम्ही तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अपडेट केले असेल तर तुम्ही चॅट बॅकअप देखील घेऊ शकता व नवीन व्हर्जन अनइन्स्टॉल करू शकता. व्हर्जन इन्स्टॉल करू शकता. मात्र तुम्ही APK अधिकृत ठिकाणावरून डाउनलोड करत आहात याचे खात्री करणे महत्वाचे आहे.

जर का तुम्ही जुने व्हर्जन पुन्हा डाउनलोड करू इच्छित नसाल तर तर चॅनेल्स फिचर हाइड करण्यासाठी एक पर्याय आहे. या पर्यायाच्या मदतीने हे फिचर बंद होत नाही तर फक्त हे फिचर तुमच्या अपडेटेड टॅबमध्ये हाइड केले जाते.

१. सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमचे व्हॉट्सअ‍ॅप ओपन करावे.

२. त्यानंतर अपडेट्सवर क्लिक करावे.

३. व्ह्यू अपडेट्स हा पर्याय सिलेक्ट करावा.

हेही वाचा : व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फीचर ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅनल’ नेमके काय आहे? जाणून घ्या सविस्तर…

वरील दिलेले पर्याय फॉलो केले असता हे फिचर App च्या पेजच्या सर्वात खाली दिसेल. जर का तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पुरेसे स्टेटस दिसत आहेत, तर हे चॅनेल्स फिचर हाइड होईल. व्हॉट्सअ‍ॅप वापरणे तुम्ही बंद केले आणि पुन्हा ओपन केले तर हे फिचर हाइड करण्याची सेटिंग पुन्हा पूर्ववत होणार आहे. म्हणजेच हे फिचर हाइड करण्यासाठी तुम्हाला पर्त्येकवेल वर दिलेली प्रक्रिया करावी लागणार आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to hide whatsapp channels feature android and iphone smartphones check all steps tmb 01