scorecardresearch

Premium

व्हॉट्सअ‍ॅपचं भन्नाट फिचर! WhatsApp Channels द्वारे आता तुम्ही आवडत्या सेलिब्रिटींना फॉलो करु शकता, कसं ते जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅपने आता भारतासह १५० देशांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप चॅनल्स लॉन्च केलं आहे.

whatsapp channels
WhatsApp चॅनेल कोणीही तयार करु शकणार. (Photo : WhatsApp)

WhatsApp Channels: व्हॉट्सअ‍ॅपने आता भारतासह १५० देशांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप चॅनल्स लॉन्च केलं आहे. WhatsApp ने या नवीन अपडेटमध्ये एक भन्नाट फिचर दिले आहे. जे तुम्हाला अ‍ॅपमध्येच तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या, तुमच्या आवडीच्या लोकांना आणि संस्थांना फॉलो करण्याची सुविधा उपलब्ध करुन देत आहे. शिवाय तुम्हाला या लोकांशी आणि संस्थांशी संबंधित अपडेट मिळू शकणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅप चॅनल्स नावाचे हे एकतर्फी प्रसारण साधन असणार आहे, जे तुमचे कुटुंबीय, मित्र किंवा समुदाय यांच्यासह तुमच्या चॅट्सपासून वेगळे असेल.

या नवीन फिचरमुळे तुम्ही कोणत्याही सेलिब्रिटी, संस्था किंवा कंपन्यांना फॉलो करु शकता. तसेच या चॅनेलमुळे कंपन्यादेखील आपल्या ग्राहकांशी कनेक्ट होणार आहेत. व्हॉट्सअॅपने सांगितले की या चॅनेलचा वापर ब्रॉडकास्टिंग टूल्स म्हणून केला जाऊ शकतो, ज्यामध्ये केवळ अ‍ॅडमिन मेसेज, फोटो, व्हिडिओ किंवा पोल पाठवू शकतील. तसेच पुढील काही आठवड्यात आणि फीडबॅकच्या आधारे, कंपनी आणखी फिचर्स अपडेट करत चॅनेलचा विस्तार करणार आहे.

Itel S23+ launch wiht 5,000 mAh battery
VIDEO: Itel ने भारतात लॉन्च केला ५० मेगापिक्सलचा AI कॅमेरा असणारा ‘हा’ स्मार्टफोन; किंमत फक्त…
kitchen tips in marathi keep sanitary pad in fridge use as cold pack kitchen jugaad video
Kitchen Jugaad Video: सॅनिटरी पॅड फ्रिजमध्ये ठेवा आणि असा वापरा; महिलाच नव्हे तर पुरुषांसाठीही मोठा फायदा
NavIC isro system use in iphone pro and pro max model
आता जगभरात भारताचा डंका; iPhone 15 सिरीजच्या ‘या’ मॉडेल्समध्ये ISRO चे GPS; जाणून घ्या…
iphone 15 and 15 plus launch check price in india
४८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह iPhone 15 आणि iPhone 15 प्लस भारतात लॉन्च; किती असणार किंमत?

हेही वाचा- वर्षभराचा रिचार्ज प्लॅन करायचा आहे? मग Reliance Jio ‘हे’ दोन प्लॅन्स वापरूनच पाहा, मिळतात ‘हे’ फायदे

कोणीही चॅनेल तयार करु शकणार –

कंपनीने सांगितले की, येत्या काही महिन्यांत आम्ही कोणालाही चॅनेल तयार करणे शक्य होणार आहे. तर Meta ने यापूर्वी सिंगापूर आणि कोलंबियामध्ये पहिल्यांदा WhatsApp चॅनेल लॉन्च केले होते. यानंतर ते इजिप्त, चिली, मलेशिया, मोरोक्को, युक्रेन, केनिया आणि पेरूमध्येही लॉन्च करण्यात आले आहे. तसेच ते आता भारतासह १५० देशांमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील काही आठवड्यांत चॅनेल जागतिक स्तरावर सुरू होणार आहे. या नव्या फिचरमुळे तुम्ही फॉलो करण्यासाठी वेगवेगळे चॅनेल शोधू शकता जे देशाच्या आधारावर आपोआप फिल्टर केले जातील तसेच नाव किंवा श्रेणीनुसार तुम्ही चॅनेल शोधू शकता. शिवाय फॉलोवर्सच्या संख्येवर आधारित लोकप्रिय चॅनेल देखील पाहू शकता.

भारतासह आणि जगभरातील काही सेलिब्रिटी, क्रिकेटपटू आणि कलाकार WhatsApp वर आधीपासूनच उपस्थित असतील. ज्यांना तुम्ही फॉलो करु शकणार आहात. WhatsApp चॅनेल उपलब्ध सर्वात खाजगी प्रसारण सेवा म्हणून डिझाइन केले आहेत. चॅनल्स फॉलोअर म्हणून, तुमचा फोन नंबर आणि प्रोफाइल फोटो किंवा इतर फॉलोवर्सच्या दाखवला जाणार नाही. तसेच तुम्ही कोणाला फॉलो करायचे हे तुमच्या निवडीवर अवलंबून असणार आहे. तर चॅनलचा इतिहास फक्त ३० दिवसांसाठी सेव्ह केला जाईल.

हेही वाचा- काय सांगता! आता इंटरनेटशिवाय देखील करता येणार ऑनलाइन पेमेंट; RBI कडून ‘हे’ फिचर लॉन्च

असे वापरा WhatsApp चॅनेल –

  • Google Play Store किंवा App Store वरून तुमचे WhatsApp अ‍ॅप अपडेट करा.
  • WhatsApp उघडा आणि स्क्रीनच्या खाली असलेल्या अपडेट्स टॅबवर क्लिक करा. तुम्ही फॉलो करू शकता अशा चॅनल्सची लिस्ट तुम्हाला दिसेल.
  • चॅनल्स फॉलो करण्यासाठी, त्याच्या नावापुढील ‘+’ बटणावर क्लिक करा. तुम्ही चॅनलचे प्रोफाइल आणि तपशील पाहण्यासाठी त्याच्या नावावर देखील क्लिक करू शकता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amazing feature of whatsapp you can follow your favorite celebrities through whatsapp channels learn how jap

First published on: 14-09-2023 at 09:36 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×