व्हॉटसअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. एखाद्या व्यक्तीशी संवाद साधण्यासाठी व्हॉटसअ‍ॅपला प्राधान्य दिले जाते, कारण त्याचा वापर सगळेच करतात. भारतात ५० कोटींहून अधिक व्हॉटसअ‍ॅप युजर्स आहेत. या मोठ्या संख्येसह व्हॉटसअ‍ॅप स्कॅम करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. व्हॉटसअ‍ॅप स्कॅमच्या जाळ्यात अनेकजण अडकतात आणि स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेतात. यापासून वाचण्यासाठी व्हॉटसअ‍ॅप स्कॅम कसे ओळखायचे जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असे ओळखा व्हॉटसअ‍ॅप स्कॅम

अनोळखी नंबर

जर तुम्हाला अनोळखी नंबरवरून व्हॉटसअ‍ॅपवर मेसेज आला तर कदाचित तो स्कॅम असु शकतो. त्यामुळे अनोळखी नंबर वरून आलेल्या मेसेजेसपासून सावध राहा.

फॉर्वर्डेड मेसेजेस

अनेकवेळा फॉरवर्ड केलेले मेसेज देखील स्कॅमचा भाग असु शकतात. यासाठी अनेकवेळा फॉरवर्ड केलेल्या मेसेज तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या व्यक्तींनीच पाठवलेले असतात. फेक न्युज, व्हायरल व्हिडीओ अशा फॉरवर्ड मेसेजचाही यात समावेश असु शकतो. यासाठी ‘फॉर्वर्डेड मेनी टाइम्स’ यामधील मेसेज फॉरवर्ड करणे टाळा किंवा ज्यांनी असे मेसेज पाठवले त्यांना असे मेसेज न पाठवण्याचा सल्ला द्या, यामुळे हे स्पॅमचे जाळे तोडण्यास मदत होईल.

आणखी वाचा: वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर काय परिणाम होतो? जाणून घ्या अशावेळी काय करावे

अननोन लिंक्स

अनेकवेळा अननोन लिंक्सदेखील फॉरवर्ड केल्या जातात. आपण त्यामध्ये काय माहिती आहे हे पाहण्यासाठी त्या ओपन करतो. पण त्यामुळे स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकण्याची भीती असते. त्यामुळे अननोन लिंक्स ओपन करणे टाळा.

लॉग इन रिक्वेस्ट

सामान्यतः कोणत्याही वेबसाईटचा ओटीपी वेरीफीकेशन, लॉग इन मेसेज व्हॉटसअ‍ॅपवर पाठवला जात नाही. त्यामुळे लॉग इन रिक्वेस्टद्वारे स्पॅम मेसेज पाठवला जातो, त्यामुळे अशा मेसेजवर क्लिक करणे टाळा.

आणखी वाचा: Save नसलेल्या नंबरवरही पाठवू शकता Whatsapp Message, फॉलो करा ‘या’ स्टेप्स

स्कॅमपासून वाचण्यासाठी काय करता येईल

  • चुकीचे, खोटी माहिती पसरवणाऱ्या ग्रुपमधून बाहेर पडा.
  • जर तुम्हाला कोणीही ग्रुप्समध्ये अ‍ॅड करत असेल तर ते थांबवण्यासाठी सेटींग्स बदला. व्हॉटसअ‍ॅप > अकाउंट > प्रायवसी > ग्रुप्स या सेटिंगमध्ये जाऊन ‘डिफॉल्ट’च्या जागी ‘माय कॉन्टॅक्टस’ पर्याय निवडा.
  • स्पॅम मेसेज रिपोर्ट करा.
  • सतत अनोळखी नंबरवरुन मेसेज येत असतील तर त्या नंबरला ब्लॉक करा.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to identify spam on whatsapp and how to avoid it know easy steps pns